Crop Damage Compensation: जालना : जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील नुकसानग्रस्तांना द्यावयाच्या मंजूर १६१ कोटी ८५ लाख ७० हजार ७६७ रुपये मदत निधीपैकी तब्बल १५१ कोटी १३ लाख ६५ हजार ९७५ रुपयांचा निधी वाटप झाले, असल्याची माहिती पुढे आली आहे..Flood Compensation: नांदेडमध्ये ४५९ कोटींच्या मदतीसाठी अतिवृष्टिग्रस्तांची माहिती अपलोड.शासन निर्णयानुसार, जालना जिल्ह्यातील जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४३१ कोटी ८१ लाख ४२ हजार ५ रुपये मदत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आठही तालुक्यात सुमारे ६ लाख २९ हजार ६५१ बाधीत खातेदार संख्या आहे. त्यापैकी २ लाख ६२ हजार ४० नुकसानग्रस्त शेतकरी खात्यावर १६१ कोटी ८५ लाख ७० हजार ७६७ रुपये मंजूर आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील मंजुर खात्यापैकी केवळ चार तालुक्यांतील ६७३५ खात्यावर ४ कोटी १२ लाख २७ हजार ४३९ खात्यांवर मदत वितरण सुरू सोमवारी (ता.३) सकाळपर्यंत सुरू होते. तब्बल २ लाख ४६ हजार ३३९ खात्यांची ई केवायसी पेंडींग आहे. त्यामुळे तब्बल १५१ कोटी १३ लाख ६५ हजार ९७५ रुपयांची मदत वितरण बाकी होते अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. .Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळाले १५० कोटी.दरम्यान, बधितांच्या याद्या अपलोडिंग, त्याला उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी व त्यानंतर नेमकी ही केवायसी पेंडिंग स्थिती किती हे समोर येत असल्याच सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या मंजूर निधीला बाधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी अजून प्रतीक्षाच करावी लागण्याची स्थिती आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.४) निधी वितरणात सुमारे ९५ कोटी पर्यंत वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.