Jalna News: मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. १२) दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २४० कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी केली..जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०२६-२७ चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मुंबई येथून मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना पालकमंत्री पंकजा मुंडे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जैसवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए. उपस्थित होते. .District Development Plan : जिल्हा नियोजन समिती बैठकीत ७७३ कोटींच्या नियतव्ययास मंजुरी.तर जालना येथून आमदार हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.मिन्नु, पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सूचित कुलकर्णी दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते..District Development Plan : छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास आराखड्यासाठी कार्यकारी समितीची बैठक.पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्हा जिल्हा वार्षिक योजनेच्या (डीपीडीसी) खर्चात आघाडीवर असल्याचे नमूद करत, मुख्यमंत्री १५० दिवस सुधारणा कार्यक्रम आणि १०० दिवसांच्या मूल्यमापनातही जिल्ह्याने अव्वल कामगिरी केल्याचे सांगितले. जालना ड्रायपोर्ट लवकरात-लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी या वेळी सांगितले..जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या, की २०२६-२७ साठी जालना जिल्ह्यास शासनाकडून ३५९.२४ कोटी रुपयांची निधी मर्यादा कळविण्यात आली आहे. त्यानुसार २०२६-२७ या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ३५९ कोटी २४ लाखांच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील विविध कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या मागणी नुसार ६०० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा राज्यस्तरीय बैठकीत ठेवण्यात आला आहे. .त्यामुळे सुमारे २४०.७६ कोटी रुपये अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येत असलेले विशेष प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखड्यानुसार प्रस्तावित योजनांची माहिती दिली. तसेच वाढीव निधीतून आपले सरकार सेवा केंद्र अद्ययावतीकरण, वाळू घाटांवर नियंत्रण व देखरेखीसाठी एआय कॅमेरे बसविणे, पर्यटन विकास व गड किल्ले संवर्धन, इतर जिल्हा व ग्रामीण रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण, महसुल विभाग मंडळ अधिकारी कार्यालय अद्ययावतीकरण, पशुवैद्यकीय दवाखाने चिकित्सालये बांधकाम बळकटीकरण, शासकीय कार्यालयावर सोलार, महाराष्ट्र नगरोत्थान व नागरी दलित्तोर वस्ती मध्ये पायाभूत सुविधा, रस्ते सुरक्षा बळकटीकरण, जालना शहर व ग्रामीण भागात स्ट्रीट लाइट बसविण्यात येणार, असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.