Latur News: जळकोट तालुक्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कल ज्वारीकडे वाढत असून, यावर्षी सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी ७०० ते ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे यंदा ज्वारीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे..काही वर्षांपूर्वी लोकांच्या आहारात गव्हाच्या भाकरीला जास्त प्राधान्य असल्याने गव्हाची लागवड वाढली होती. मात्र आता आरोग्यविषयक जागरूकतेमुळे ज्वारीच्या भाकरीकडे पुन्हा लोकांचा कल वाढत आहे. परिणामी, रब्बी हंगामात गव्हाऐवजी ज्वारीच्या पेरणीस अधिक प्राधान्य दिले जात आहे..Rabbi Sowing : रब्बी ज्वारीच्या पेरणीस सुरुवात ;पुणे विभागात ३९ टक्के पेरण्या पूर्ण.खरीप हंगामात पावसामुळे ज्वारीचे उत्पादन वारंवार नासते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील ज्वारी पीक सोडून दिले आहे. परंतु रब्बी हंगामात हवामान अनुकूल असल्याने आणि उत्पादनाचे नुकसान कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ज्वारीकडे वळण्यास सुरवात केली आहे. ज्वारी काढणीदरम्यान मजुरांची टंचाई, कापणीतील त्रास आणि पावसाचा धोका कायम असला तरी वाढती बाजारपेठ आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेता शेतकरी उत्साहाने पेरणी करत आहेत..Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित.पशुधनाच्या चाऱ्याचीही होते सोयतालुक्यातील शेतकरी ज्वारीची पेरणी कमी करीत होते. गतवर्षी रब्बी हंगामामध्ये ७०० ते ८०० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली. आता यावर्षी १००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ज्वारीची भाकरी खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि आजारांचा धोका कमी करण्यासही मदत करते. .ज्वारीत विविध पोषक घटक असतात. जीवनसत्त्वे, खनिजे, बी १, बी २, बी ३, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, असे तज्ज्ञाचे मत आहे. सोबतच जनावरांना कडबाही लागतो, यामुळे शेतकरी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करताना दिसत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.