Rainfall Update: मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीलाच सोमवारी (ता.२२) पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसानंतर शेतशिवारात कपाशी लागवडीसह सोयाबीनच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मृग नक्षत्रात पेरा शक्य न झाल्याने मूग, उडिदाचे क्षेत्र घटण्याची चिन्हे आहेत. .दरम्यान, शंभर मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय व जमिनीत चांगली ओल झाल्याशिवाय खरिपाच्या पेरण्या करू नयेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.आर.पाटील, कृषी सहायक विशाल इंगळे यांनी केले आहे. तालुक्यात बुधवारी (ता.२४) काही ठिकाणी दुपारी रिमझिम पाऊस पडला. या पावसानंतर काही भागांत कपाशीची लागवडही सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी रात्री आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे बांध फुटले. असे असले तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे..Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी.मूग-उडदाचे क्षेत्र घटणारयंदा मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मुगाची आणि उडिदाची वेळेत पेरणी होऊ शकलेली नाही. परिणामी, यंदा तालुक्यात मूग आणि उडिदाचा पेरा लक्षणीयरीत्या घटण्याची चिन्हे दिसत आहेत..Kharif Sowing: कमी पावसातही शेतकऱ्यांनी घेतली; पेरणीची जोखीम.Kharif Sowing:शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा इतर पिकांकडे वळवलाआहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार, या खरीप हंगामात तालुक्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होणार असून, कपाशीची लागवडही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे..कृषी विभागाकडून मार्गदर्शक सूचनाकृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. घाईगडबडीत कमी ओलीवर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे किमान १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरणी करावी. किमान सहा इंच ओल होणे आवश्यक आहे. तसेच, पेरणीच्या वेळी आणि नंतर पिकांना योग्य प्रमाणातच रासायनिक खतांची मात्रा द्यावी, जेणेकरून पिकांची वाढ जोमदार होईल आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही मर्यादेत राहील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.