Jalgaon News: खानदेशात टरबूज किंवा कलिंगड लागवड नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत अधिक झाली आहे. सध्या लागवड थांबल्याची स्थिती आहे. यंदा लागवड स्थिर आहे. पण उन्हाळ लागवड अनेकांनी टाळली आहे. .तीन महिन्यांच्या कालावधीत उत्पादन खर्च अधिक असलेल्या पिकात एकरी लाखाचे उत्पन्न घेत शेतकरी या पिकाकडे वळले. परंतु यंदा उत्पादन कमी व खर्च अधिक अशी स्थिती आहे. दरही अस्थिर आहेत. यात नोव्हेंबर २०२५ मध्ये लागवड केलेल्या कलिंगड पिकास थंडी, विषम वातावरणाचा फटका बसला असून, पिकाचे चोपडा, यावल भागात नुकसान झाले आहे. यातच २७ जानेवारी रोजी चोपडा व धुळ्यातील शिरपूर भागात गारपीट, वादळी पाऊस झाल्याने कलिंगड पिकाची हानी झाली आहे. चोपड्यातील विरवाडे व अन्य भागात पिकाची मोठी हानी झाली आहे..Watermelon Cultivation: खानदेशात कलिंगड लागवड थांबली.काही शेतकऱ्यांनी यंदा एका एकरात हे पीक घेऊन नशीब आजमावण्याचा प्रयोग केला त्यातून त्यांना एकरी ५० ते ६० हजार रुपयांचेच उत्पन्न हाती आले आहे. मागील वेळेसही हा नफा कमी होता. कारण मागील हंगामात दर कमी मिळाले. सध्या दर टिकून आहेत. पण उत्पादन हवे तसे नाही. कलिंगड पीक कमी दिवसात येणारे आहे. पण हे जोखमीचे पीक असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील हंगामात रमझान महिन्यातही कलिंगडास दर हवे तसे नव्हते..Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड सुरू.उष्णतेत नुकसानीची भीतीउष्णतेत अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. याचा फटका बसण्याची शक्यता असते. तसेच पिकात रोगराई येण्याची भीतीही असते. बुरशीजन्य, विषाणूजन्य रोग पिकात वाढत आहेत. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यातच नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लागवड केलेल्या कलिंगड पिकात नुकसान आल्याने या महिन्यातील कलिंगड लागवड थांबल्याचे दिसत आहे..लागवड स्थिर...खानदेशात डिसेंबर, जानेवारीत टरबूज लागवड अधिक झाली. परंतु फेब्रुवारीत अनेकांनी लागवड टाळली आहे. उष्णतेच्या काळात उठाव अधिक असतो व दरही चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु मागील वेळेस सर्वच अंदाज फोल ठरले होते. यातच यंदा नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत कलिंगड लागवड झाली असून, खानदेशातील एकूण लागवड सात हजार हेक्टरवर झाली आहे, अशी माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.