Jalgaon News: खानदेशात कोरडवाहू हरभरा कापणी व काढणीस वेग आला आहे. अजूनही अंशतः ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची भीती आहे. यामुळे कापणी, मळणीचे काम गतीने सुरू आहे. .मजूरटंचाईत काम रखडत सुरू आहे. एकरी चार हजार रुपये कापणीसाठी लागत आहेत. दादर ज्वारी, गहू मळणीचे काम अजून सुरू झालेले नाही. पण दादर ज्वारीदेखील मळणीवर येत आहे. यामुळे ज्वारी कापणी, मळणीदेखील पुढील पंधरवड्यात गतीने सुरू होणार आहे. यासाठी मजुरांची अधिकची गरज आहे. .Chana Harvesting : हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत.हरभरा कापणी व गोळा करण्यासंबंधी एकरी चार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे. मजूरटंचाई असल्याने शेतकऱ्यांना सात ते आठ दिवसांची प्रतीक्षा काम करून घेण्यासाठी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असून, अधिकचा उत्पादन खर्च लागत आहे..Chana Harvesting : हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत.कोरडवाहू पीक मोठेअनेक भागात कोरडवाहू हरभरा पेरा दिवाळीनंतर झाला होता. पीक पक्व होवून त्याची मळणी वेळेत सुरू केली जाते. अन्यथा दाणे गळून पडतात. यात नुकसान होते. कोरडवाहू हरभरा पीक खानदेशात सर्वत्र असते. पण काळ्या कसदार जमिनीत ही पेरणी अधिक असते. चोपडा, अमळनेर, जळगाव, यावल, .रावेर, धुळ्यातील शिरपूर भागात कोरडवाहू पीक अधिक होते. या भागात पीक मळणीवर येत असून, मळणीचे काम काही भागात गती घेत आहे. खानदेशात हरभरा हुकमी रब्बी पीक आहे. हरभऱ्याची एकूण सुमारे एक लाख ६५ हजार हेक्टरवर पेरणी धुळे, नंदुरबार व जळगावात मिळून झाली होती. एकट्या जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र एक लाख १० हजार हेक्टर एवढे होते. यात बागायती हरभरा पीक अधिक आहे. तसेच मोठा काबुली (डॉलर किंवा मॅक्सीको) हरभरा पीकही आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.