Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात गिरणा पट्ट्यात भूजलपातळी दिवसागणिक खालावत आहे. केळी, भाजीपाला पिकांसाठी शिवारात पाणीवापर वाढला आहे. यामुळे विहिरी, कूपनलिकांची जलपातळी घटली आहे..गिरणा पट्ट्यात पाऊसमान दोन वर्षे चांगले आहे. बागायती वाढली आहे. यातच गिरणा नदीत टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन सोडले आहे. परंतु पाणीवापर शिवारात वाढला आहे. नदीकाठच्या शिवारातही काही भागात मुबलक जलसाठे नाहीत. कारण जलपातळी वर्षागणिक घटली आहे. नदीत वाळू नाही. नदीतून पाणी वाहून जाते. ते मुरण्यासाठी वाळू महत्त्वाची असते. .Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज.यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कारण नदीतून वाळूउपसा सतत सुरू आहे. विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नाही. गिरणा पट्ट्यातील सर्वच प्रकल्प यंदा भरले होते. गिरणा धरणातील जलसाठा चांगला आहे. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. अन्य लहान - मोठे तलावही बऱ्यापैकी भरले आहेत. यामुळे बागायती शेती वाढली आहे. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव हा भाग केळी, लिंबू व अन्य पिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी पाणीवापर वाढला आहे..Groundwater Management: शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक माहितीचा वापर करावा.केळी पीक कमी पाण्यात तग धरत नाही. लहान केळीस रोज किमान दोन ते अडीच तास पाणी हवे आहे. तर मोठ्या केळीस रोज तीन ते चार तास पाणी उष्णतेत किंवा तापमान ३५ अंश सेल्सीअसवर गेल्यास हवे असते. सध्या केळीस रोज दोन तास पाणी अनेक शेतकरी देत आहेत. कूपनलिकांत १० ते १२ अश्वशक्तीचे कृषिपंप आहेत. त्यातून मोठा पाणीउपसा सुरू असतो. यामुळे जलपातळी घटली आहे..खोलीकरणही निरूपयोगीअनेक शेतकऱ्यांनी गत काळात विहिरी, कूपनलिकांचे खोलीकरण करून घेतले आहे. त्यावर मोठा खर्चही झाला आहे. यामुळे पाणी मुबलक आहे. पण पाणीपातळी खोल जात आहे. ही चिंतेची बाब आहे. पूर्वी विहिरी, कूपनलिका गिरणा पट्ट्यातील अनेक भागात १०० ते १२० फुटांवर कार्यरत होत्या. काही भागात २०० ते २२० फुटांवर कूपनलिकांतून पाणी उपसा व्हायचा. पण अलीकडे २०० फुटांवर कूपनलिकांतून उपसा होवू शकतो. काही भागात ३०० ते ४०० फूट खोल कूपनलिका खोदाव्या लागत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.