Farmer Hope: जळगाव जिल्ह्यात यंदा ओल्या दुष्काळामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर झाली असली तरी जलसाठा मुबलक असल्याने आणि शिवारात हिरवा चारा उपलब्ध झाल्याने दूध उत्पादकांना काहीसा दिलासा मिळत आहे. तसेच हवामान अनुकूल राहिल्यास रब्बी हंगाम जोमात येईल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे.