Government Scheme: अतिवृष्टी, दुष्काळ, नापिकी व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात घट यामुळे हजारो शेतकरी थकीत पीककर्जदार यादीत गेले आहेत. ऑगस्ट २०२५पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या दोन जूनच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीअंतर्गत दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश जाहिर केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात थकीत पीककर्जदार यादीत असलेल्या तब्बल ९२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे..विशेष म्हणजे ९२ हजार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असलेला थकीतचा शिक्का पुसला जाणार आहे. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनाही हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे प्रोत्साहन लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२५-२६अंतर्गत जिल्हा बँकेअंतर्गत थेट व विकास सोसायट्यांमार्फत एक लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांना एक हजार ८० कोटी दोन लाख रुपये पीककर्जाचे वितरण केले होते. या पीककर्जाची ३१ मार्च २०२६अखेर तब्बल १७ कोटी ७६ लाख रुपये अर्थात वितरीत केलेल्या कर्जाच्या ९५ टक्के परतफेड केली आहे. यात शेतकरी सभासदांची १५५ ‘विकासो’अंतर्गत १०० टक्के पीककर्ज परतफेड झाली आहे..Farm Loan Waiver: पुणे जिल्ह्यात ३.१५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.प्रामाणिकपणे दरवषी मार्चअखेर पीककर्जाची परतफेड करणाऱ्या जिल्ह्यातील दोन लाख ४३ हजार २४६ शेतकरी सभासदांनी नियमित कर्ज परतफेड केली असल्याची माहितीही पूर्णपणे भरण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ५० हजार रुपयेप्रमाणे शासनाकडून प्रोत्साहन लाभ मिळणार आहे.तत्कालीन शासनाकडून २०१८दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ४२ हजार ५४१ शेतकऱ्यांना ९६२.९५ कोटी रकमेची कर्जमाफी दिली होती. नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या १ लाख १ हजार १० शेतकऱ्यांना १५३ कोटी ८७ लाख रूपये प्रोत्साहन लाभ दिला होता. २०२२ दरम्यान पावणेदोन लाख शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत एक हजार कोटीची कर्जमाफी व काही हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ अंमलबजावणी करीत दिलासा दिला होता..Farm Loan Waiver: चाळीस लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .तब्बल ५१२ कोटींची माफीशासनाने कर्जमाफीसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार राष्ट्रीयीकृत बँकांकडून व जिल्हा बँकेचे थकीत पीककर्जदारांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाला पोर्टलवर सादर करण्यात आली आहे. यात जिल्हा बँकेचे सप्टेंबर २०२५पर्यंत ९२ हजार ६०९ सभासद थकबाकी पीककर्जदार आहेत, त्यांच्याकडे असलेली ५१२ कोटी ३२ लाख रुपये थकबाकीची रक्कम आहे..जिल्हा बँक आघाडीवरजिल्हा बँकेने २०१९ ते आतापर्यत केवळ वितरीत केलेले पीककर्ज मुद्दल रक्कमेचा करण्याचे आवाहन करीत शून्य टक्के व्याजदर सवलत दिली आहे. त्यानुसार यंदाही १७ कोटी ७६ लाख रुपये अर्थात वितरीत केलेल्या कर्जाच्या ९५ टक्के भरणा केलेल्या नियमित शेतकरी पीककर्ज सभासदांना २०२६-२७ अंतर्गत आतापर्यंत १ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना एक हजार २५ कोटीहून अधिक खरीप पीककर्जाचा लाभ दिला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.