Banana Farmers: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत २०२५-२६ हंगामात केळी पिकाचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांमध्ये विमा परतावा आणि नुकसानभरपाईबाबतचा गोंधळ अद्याप कायम आहे. विमा कंपनी आणि कृषी विभागाने तांत्रिक त्रुटींच्या आधारे अनेक विमा प्रस्ताव रद्द केल्याचा, तर अनेक प्रस्ताव ‘ओव्हर इन्शुरन्स’मध्ये टाकल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत..शेतकऱ्यांकडून विम्याचा हप्ता स्वीकारण्यात आला असला, तरी प्रस्तावांबाबत उद्भवलेल्या अडचणी दूर झालेल्या नाहीत. शेतकरी सातत्याने विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे तक्रारी करत आहेत. मात्र, या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनातील मंत्र्यांकडेही हा विषय मांडण्यात आला असला, तरी त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत..Crop Insurance Company: विमा कंपनीच्या कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसादच नाही.२०२५-२६ हंगामात जिल्ह्यातील सुमारे एक लाख हेक्टरवरील केळी पिकाचा हवामानावर आधारित फळ पीकविमा उतरविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीसाठी विमा संरक्षण लागू असून, हा कालावधी संपण्यास आता अवघे ३४ दिवस शिल्लक आहेत..Crop Insurance Company: विमा कंपनीच्या कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसादच नाही.नियमानुसार विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांच्या आत पात्र विमाधारकांना नुकसानभरपाई किंवा विमा परतावा अदा करणे अपेक्षित आहे. मात्र, मागील हंगामातही विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर परतावा देण्यास मोठा विलंब झाला होता. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे..राज्य शासन या योजनेअंतर्गत केळी पिकासाठी हेक्टरी अतिरिक्त विमा परतावा देते. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच विमा कंपनी आणि कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप आहे. चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याने आणि ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली अनेक प्रस्ताव अडवल्याने जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार केळी उत्पादकांवर अन्याय झाल्याचा दावा शेतकरी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.