Storm Damage: जळगाव जिल्ह्यात गुरुवार (ता. ४), शुक्रवार (ता. ५) आणि शनिवार (ता. ६) असे सलग तीन दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे रावेर, यावल, जळगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर परिसरातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..रावेर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. निरूळ, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रूक, अटवाडे, खिर्डी, ऐनपूर, रसलपूर तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील तापीकाठच्या गावांमध्ये केळीच्या बागा मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त झाल्या. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द आणि आव्हाणे परिसरातही जोरदार वाऱ्यांमुळे केळीचे नुकसान झाले. चोपडा तालुक्यातील गोरगावले, माचले, मंगरूळ, वर्डी, खर्डी, पंचक आणि धानोरा या भागांत वादळामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत..Banana Crop Damage: मुक्ताईनगर तालुक्यात वादळाचा फटका.यावल तालुक्यातील किनगाव, मनवेल, न्हावी आणि थोरगव्हाण परिसरालाही मोठा फटका बसला आहे. यावल, जळगाव, चोपडा, रावेर आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, सलग तीन दिवस वादळ झाल्यामुळे अनेक गावांत पुन्हा जाऊन नुकसानीची नोंद घ्यावी लागत आहे. काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असले तरी वाऱ्याचा वेग अधिक होता. रावेर तालुक्यातील काही गावांत मात्र गुरुवारी जोरदार पाऊस झाला..Banana Crop Damage: मुक्ताईनगर तालुक्यात वादळाचा फटका.केळी विमाधारकांना फटकाहवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळण्याची तरतूद आहे. मात्र, नुकसान झाल्यानंतर तक्रार करूनही विमा कंपनीचे प्रतिनिधी १५ ते १८ दिवस घटनास्थळी पोहोचत नसल्याची तक्रार चोपडा आणि यावल परिसरातील शेतकरी करीत आहेत. मागील महिन्यातील वादळानंतरही नुकसान नोंदवून १५ दिवस उलटून गेल्यानंतर पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. .तसेच पंचनाम्यावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष पीक पडताळणी करून लागवड क्षेत्र, गट क्रमांक आणि विमा संरक्षणाची माहिती तपासत आहेत. विमा घेतलेल्या क्षेत्रापेक्षा कमी लागवड आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र तातडीने कमी (ओव्हर इन्शुरन्स) करण्यात येत असल्याचीही तक्रार आहे..मंत्रीगण व्यस्तच...कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊनही जिल्ह्यातील कोणत्याही मंत्र्याने बाधित केळी उत्पादकांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलासा दिलेला नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या सर्व राजकीय नेते विधान परिषद निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. शेतकरी प्रश्न, वादळातील नुकसान आणि शेतीमालाच्या दरांचे प्रश्न गंभीर असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मागील आठवड्यात पाळधी (ता. धरणगाव) येथे वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राजकीय भाषणे आणि टोलेबाजी झाली; मात्र बाधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे सांत्वन करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला नसल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, रावेरचे आमदार अमोल जावळे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बाधित भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भुसावळचे आमदार तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याबाबतही शेतकरी प्रश्न उपस्थित करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.