Jalgaon News : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड (एनएचबी) अंतर्गत सुरू झालेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम (सीडीपी) मध्ये जिल्ह्यातील केळी क्लस्टरचा समावेश झाला आहे. .महाराष्ट्र राज्य फळबाग व औषधी वनस्पती मंडळ (एमएसएचएमपीबी) हे क्लस्टर डेव्हलपमेंट एजन्सी (सीडीए) म्हणून नियुक्त झाले आहे. आता या कार्यक्रमासाठी इंप्लिमेंटिंग एजन्सी निवडल्या जाणार आहेत. त्यासाठी शेतकरी, एफपीओ सहकारी संस्था, उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. .Banana Cluster : नांदेडमध्ये केळीचे क्लस्टर होण्यासाठी प्रयत्नशील ; खासदार प्रा. रवींद्र चव्हाण .जळगाव केळी क्लस्टरमध्ये मूल्यसाखळी मजबूत करण्यासाठी तीन महत्त्वाच्या क्षेत्रांत काम होणार आहे. पूर्वउत्पादन व उत्पादन, टिश्यू कल्चर प्लांट, लागवड साहित्य, इंटिग्रेटेड पेस्ट ॲण्ड मॅनेजमेंट, यांत्रिकीकरण, शेतकरी प्रशिक्षण, पश्चात-उत्पादन व्यवस्थापन व मूल्यवर्धन, पॅक हाऊस, रिपनिंग चेंबर, प्रोसेसिंग युनिट, कोल्ड चेन, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग व ब्रँडिंग, थंडगार वाहतूक, शेतकरी बाजार, देश-विदेशातील ब्रँडिंग, निर्यात वाढविणे आदींचा समावेश आहे..Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित.शेतकरी, संघटनांसाठी संधीजळगाव मेगा क्लस्टर : १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रशंभर कोटींपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकतेप्रत्येक घटकासाठी ४० टक्क्यांपर्यंत निधीएकत्रित प्रकल्पासाठी जास्त लवचिकताचार वर्षांत प्रकल्पाची अंमलबजावणी.शेतकरी, ‘एफपीओ’ सहकारी संस्था व उद्योजकांना जळगावच्या केळी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याची चांगली संधी आहे. आपल्या मेहनतीला योग्य किंमत, जागतिक बाजारपेठ गाठणे यातून शक्य होणार आहे. त्यासाठी एकत्र येऊन गुंतवणूक करा, नावीन्य आणा व जळगावच्या केळी क्लस्टरला जागतिक स्तरावर पोहोचवा.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.