Yavatmal News: जलजीवन मिशनचा निधी तुकड्यातुकड्यांत वितरित केला जात आहे. आजघडीस तब्बल १२८ कोटींची देयके थकीत आहे. पाणी पुरवठा विभागाने निधीची मागणी केली. प्रलंबित देयकांअभावी कंत्राटदारांनी संपूर्ण कामे ठप्प पाडली आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक कामे पूर्णत्वास आली आहेत..जलजीवन मिशनच्या कामांना मार्च २०२४ पासून चांगलीच घरघर लागली आहे. निर्धारित कालावधीत कामे पूर्ण न होणे, यासह कामांची गुणवत्ता यामुळे केंद्राने निधी वितरणाला ब्रेक लावला होता. टप्प्या-टप्प्यात राज्य शासनाने थोडाफार निधी उपलब्ध करून दिला. परंतु कंत्राटदारांचे देयके निकाली काढल्या जात नव्हती. या प्रकारामुळे बहुतांश कंत्राटदार अडचणीत आले होते..Jaljeevan Mission : नाशिक जिल्ह्यात जलजीवनची २६८ कामे अंतिम टप्प्यात.वेळोवेळी कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिली. मात्र केंद्रानेच निधी अडकविल्याचे कारण सांगण्यात येत होते. शेवटी प्रलंबित देयकाअभावी कंत्राटदारांनी कामांवर बहिष्कारसुद्धा टाकला होता. अधूनमधून अत्यल्प निधी वितरित केला जात होता. त्या निधीतून दहा टक्के प्रमाणे कंत्राटदारांचे देयके निकाली काढण्यात येत होते..Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्मी कामे अपूर्ण .याचा परिणाम कामांवर पडला आहे. आजघडीस ६० टक्क्यांहून अधिक जलजीवन मिशनच्या टाक्या, विहीर, बोअर, पाइपलाइन आदींची कामे पूर्णत्वास आली आहे. तब्बल १२८ कोटी रुपयांची देयके पाणी पुरवठा विभागात पडून आहे. मात्र, निधी नसल्यामुळे हवालदिल झालेल्या कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दर्शविला आहे. आता निधी आल्यानंतर देयके निकाली काढताच प्रत्यक्षात कामाला सुरुवात करू, असा सूर कंत्राटदारांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे..जानेवारीत मिळाले अवघे सहा कोटीसव्वाशे कोटींहून अधिक रुपयांची देयके पाणीपुरवठा विभागात पडून आहे. असे असताना जानेवारी महिन्यात अनुसूचित जाती-जमाती क्षेत्रातील जवळपास सहा कोटी रुपये प्राप्त झाले होते. प्राप्त झालेल्या निधीतून ३३ टक्के काम पूर्ण झालेल्या कंत्राटदारांचे देयके निकाली काढण्यात आली. देयके निघालेल्यांमध्ये अत्यल्प कंत्राटदारांचा समावेश आहे. आता सर्वसाधारण क्षेतातील कामांच्या निधीची प्रतीक्षा कंत्राटदारांना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.