Water Crisis: सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे डिसेंबर २०२५ पासून ठप्प झाली आहे. ठेकेदारांची सुमारे ५० कोटी रुपयांची बिले थकली आहेत. निधीअभावी त्यांनी कामे बंद ठेवली आहेत. ही कामे कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे..जलजीवन मिशन योजनेची गतवर्षी ३१ मार्च २०२४ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश होते. त्यानंतर दोन वर्षे उलटली असून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरीही निधीअभावी कामे पुढे सरकत नाहीत. परिणामी, योजनेचा बोजवारा उडाला आहे. कामांची गती लक्षात घेता केंद्र सरकारनेही या योजनेला २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र ऑक्टोबर २०२४ पासून केंद्र सरकारकडून निधी मिळालेला नाही..Jal Jeevan Mission: किरंगीसरा गावात पोहोचविले ‘जलजीवन’ योजनेतून पाणी.राज्य सरकारकडूनही निधी न आल्याने ठेकेदारांनी कामे बंद ठेवली आहेत. यापूर्वी मुदतवाढीमुळे योजनेच्या खर्चात १३२ कोटी रुपयांची वाढ झाली होती. सुरुवातीचा खर्च ७९२ कोटी २१ लाख रुपये होता. तो आता ९२४ कोटींवर गेला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे..Jal Jeevan Mission: ‘जल जीवन’ला वीज जोडणीची प्रतीक्षा.जिल्ह्याला ६८३ योजनांचे उद्दिष्टसांगली जिल्ह्याला ६८३ योजनांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ३९२ कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे २९१ कामे अद्याप अपूर्ण आहेत. पूर्ण झालेल्या कामांपैकी २३९ योजनांचे हस्तांतर करण्यात आले आहे..‘जलजीवन मिशन’साठी वर्षभरापासून निधी आलेला नाही. ठेकेदारांची सुमारे ५० कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. गतवर्षी मार्चमध्ये थोडाफार निधी आला होता; त्यानंतर निधी मिळालेला नाही. या बाबत शासनाला अहवाल पाठवला आहे. निधीअभावी कामे बंद आहेत.- संजय येवले, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.