Marathwada Agri Update: पावसाच्या अनिश्चिततेमुळे मराठवाड्यात खरीप पेरणीचा वेग अद्यापही मंदावलेलाच आहे. १० जुलैअखेर मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ६४ टक्के पेरणी झाली आहे. एकूण ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ३१ लाख ८० हजार ९७५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे..पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांतील २१ लाख ४२ हजार २३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १३ लाख ९३ हजार ६३५ हेक्टरवर, तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील २८ लाख ३० हजार ७४३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ लाख ८७ हजार ३४० हेक्टरवर पेरणी झाली आहे..सध्या अनेक भागांत टप्प्याटप्प्याने पेरणी सुरू असून, काही ठिकाणी पेरणी तर काही ठिकाणी कोळपणीची कामे सुरू आहेत. जिल्हानिहाय पेरणीची टक्केवारी पाहता छत्रपती संभाजीनगरमध्ये ६८ टक्के, जालन्यात ६७ टक्के, बीडमध्ये ६१ टक्के, लातूरमध्ये ४३ टक्के, धाराशिवमध्ये ५१ टक्के, नांदेडमध्ये ७७ टक्के, परभणीत ६९ टक्के आणि हिंगोलीमध्ये ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे..Marathwada Kharif Sowing: मराठवाड्यात केवळ २२ टक्के खरीप पेरणी.खरीप ज्वारीची केवळ ६ टक्के पेरणीमराठवाड्यात खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ७८ हजार ८८९ हेक्टर आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ४ हजार ३३७ हेक्टर, म्हणजेच ६ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे..सोयाबीनची ७४, कपाशीची ६३ टक्के पेरणीएकूण ३१ लाख ८० हजार ९७५ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी सुमारे १७ लाख ६७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर असून त्यापैकी ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १४ लाख ७९ हजार ५३६ हेक्टर असून प्रत्यक्षात ९ लाख ३५ हजार ६१३ हेक्टर, म्हणजेच ६३ टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे..Kharif Sowing: मराठवाड्यात पेरणी २४.५५ लाख हेक्टरवर.जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)छत्रपती संभाजीनगर ४ लाख ६४ हजार ४३७जालना ४ लाख ३६ हजार ६३१लातूर २ लाख ५३ हजार ५०२बीड ४ लाख ९२ हजार ५६७धाराशिव २ लाख ८० हजार ७८७नांदेड ५ लाख ९० हजार ११६परभणी ३ लाख ५८ हजार ०६६हिंगोली ३ लाख ४ हजार ८६८.१.९१ लाख हेक्टरवर मकामराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे प्रमुख मका उत्पादक जिल्हे आहेत. याशिवाय इतर जिल्ह्यांतही मका दोन ते तीन हंगामांत घेतला जातो. आठही जिल्ह्यांतील मकाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ५६ हजार ६५० हेक्टर असून, त्यापैकी १ लाख ९१ हजार १५८ हेक्टर, म्हणजेच ७४ टक्के क्षेत्रावर मका लागवड झाली आहे..तुरीची पेरणी ५४ टक्क्यांवरमराठवाड्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ४५ हजार ९९५ हेक्टर आहे. त्यापैकी २ लाख ३९ हजार ६०३ हेक्टर, म्हणजेच ५४ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी पूर्ण झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.