Rural Economy: यंदाच्या ऊस गाळप हंगामात स्थानिक गूळ उत्पादन युनिटने (गुऱ्हाळ) आपल्या गाळप क्षमतेत मोठी वाढ करत विक्रमी टप्पा गाठला आहे. घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढता कल आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरामुळे चार गूळ युनिट मालकांनी जवळपास वीस हजार टन उसाचे गाळप केले आहे..यंदा पावसाचे प्रमाण जास्त तसेच वाढती थंडीमुळे उसाची प्रत चांगली येण्यास उशीर झाला. त्याचा परिणाम म्हणून गूळ युनिट उशिरा सुरू झाले. मात्र, तरीही गाळप चांगल्या प्रकारे झाले. अनेक ठिकाणी आता जुन्या चरख्यांऐवजी आधुनिक क्रशरचा वापर केला जात आहे. ज्यामुळे उसाचा रस काढण्याची क्षमता वाढली आहे. शुद्ध आणि रसायनविरहित गुळाला बाजारात मोठी मागणी असल्याने अनेक युनिट्सनी ''सेंद्रिय गूळ'' निर्मितीवर भर दिला आहे. .Jaggery Production: गूळ बनवताना होणाऱ्या चुका टाळा; उत्पादनातील तूट वाचवा.गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा गाळपात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. साखर कारखान्यांच्या तुलनेत वेळेवर मिळणारा परतावा आणि तोडणीचे सुयोग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांनी गूळ युनिटला पसंती दिली आहे. उसाच्या दर्जेदार वाणांमुळे गुळाचा उताराही समाधानकारक मिळत असून, उत्पादित गुळाला बाजारपेठेत अंदाजे ३५०० ते ४००० रुपये इतका भाव मिळत आहे..Jaggery Production: उसापासून गूळ निर्मितीचे शास्त्रीय तंत्र.शेतकऱ्यांना गूळ युनिट मालकांनी तीन हजारांपेक्षा जास्त भाव एकाच टप्प्यात दिला. तसेच उसाची तोडणी लवकर होऊन रब्बीतील इतर पिके घेण्यासाठी शेत मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना प्राधान्य दिले. .या युनिटने केवळ गाळपावरच भर दिला नाही, तर गुळाच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष दिले आहे. केमिकलमुक्त (सेंद्रिय) गूळ उत्पादनावर भर दिल्याने ग्राहकांकडून या मालाला आगाऊ पसंती मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर गाळप होत असतानाही स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जात असल्याचे युनिटच्या वतीने सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.