Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वर्षी तब्बल सहा महिने पावसाचे होते. या कालावधीत ४०३९.२ मिमी पाऊस झाला. सरासरीपेक्षा ३१ दिवस अधिक आणि ५०३ मिमी अधिक पाऊस झाला. मॉन्सूनोत्तर पावसाचे दिवसही वाढल्याने भात, नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले..जिल्ह्यात या वर्षी ८ मे रोजी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मॉन्सूनपूर्व पावसाचा धडाकाच सुरू झाला. २५ मे रोजी जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर ८ नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता. त्यामुळे ८ मे ते ८ नोव्हेंबर असा सहा महिने पाऊस बरसला..Hawaman Andaj : राज्यात थंडीचा कडाका कायम; खानदेश, विदर्भात किमान तापमानातील घट कायम.मेमध्ये ५८२.८ मिमी पाऊस झाला. १९९१ ते २०२४ पर्यंतच्या सरासरीनुसार सिंधुदुर्गात ३५०५.८५ मिमी पाऊस होतो. या वर्षी ४०३९.२ मिमी पाऊस झाला. तुलनेत पाऊस केवळ ५०३.३५ मिमी अधिक झाला..दरवर्षी मे ते नोव्हेंबर या कालावधीत १०९ दिवस पाऊस व्हायचा परंतु या वर्षी १४० दिवस झाला. पावसाचे तब्बल ३१ दिवस वाढले. जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस २१ दिवस झाला. याचा सर्वाधिक फटका भात, नाचणी पिकांना बसला..Maharashtra Weather: राज्यात हुडहुडी वाढली.महिना १९९१ ते २०२४ सरासरी पाऊस (मिमी) २०२५(मिमी)मे ७५.१ ५८२.८जून ८८०.२ ६९७.६जुलै १२०५.१ १०९४.२ऑगस्ट ७१६.९ ९७१सप्टेंबर ३९७.६ ३४४.४ऑक्टोबर २०२.२ २८७.२नोव्हेंबर ४० ४७.८.लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यात भातपिकांचे मोठे नुकसान झाले. पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालानुसारच विमा परतावा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहून पीक कापणी प्रयोग योग्यरित्या करून घ्यावेत आणि नुकसान पातळी योग्य ठरविली जाण्याकरिता पाठपुरावा करावा.डॉ. विजय दळवी, सहयोग अधिष्ठाता तथा प्रमुख ग्रामीण कृषी मौसम सेवा उद्यानविद्या मुळदे, ता. कुडाळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.