ठळक मुद्देफेब्रुवारी २०१९ पासून साखरेचा विक्री दर प्रति किलो ३१ रुपये एवढा कायमहा विक्री दर प्रति किलो ४०.२ रुपये करण्याची इस्माची मागणीसाखरेचा विक्री दर वाढवल्यास शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे वेळेवर देणे शक्य होईल.Sugar MSP: साखरेचा किमान विक्री दर (MSP) प्रति किलो ४०.२ रुपये (प्रति क्विंटल ४,०२० रुपये) करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स आणि बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (ISMA) सरकारकडे केली आहे. २०२५-२६ च्या साखर हंगामाच्या तुलनेत हा दर ९ रुपयांनी अधिक आहे, असे इस्माचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.."फेब्रुवारी २०१९ पासून साखरेचा विक्री दर प्रति किलो ३१ रुपये एवढा कायम आहे. त्यात बदल केलेला नाही. जरी ऊस एफआरपीत दरवर्षी वाढ करण्यात येत असली तरी, उत्पादन खर्च आणि विक्री दर यांच्यात तफावत वाढत आहे," असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे साखरेचा विक्री दरदेखील उसाच्या एफआरपीशी सुसंगत असला पाहिजे; जेणेकरून कारखाने सुरळीत चालतील आणि शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे वेळेवर मिळतील, असेही त्यांनी नमूद केले आहे..Sugar Production: ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात १८ टक्के वाढ.इस्माने केलेली साखर विक्री दराची मागणी ही उसाचा वाढता उत्पादन खर्च, प्राथमिक कच्च्या मालाच्या किमती आणि साखरेच्या उताऱ्यात झालेली घट यावर आधारित आहे. या सर्व बाबी लक्षात घेता साखर उत्पादनाचा खर्च वाढला आहे. साखरेच्या वाढीव विक्री दरामुळे कारखान्यांना त्यांचा उत्पादन खर्च काढण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे वेळेवर देणे शक्य होईल. यामुळे साखर उद्योगाला स्थैर्य मिळेल, असे इस्माचे म्हणणे आहे..२०१८-१९ हंगामापासून ऊस एफआरपीमध्ये २९ टक्के वाढ झाली. सध्याच्या २०२५-२६ हंगामासाठीची एफआरपी प्रति क्विंटल ३५५ रुपये आहे. पण, या कालावधीत साखरेच्या विक्री दरात कोणताही बदल झालेला दिसून आला नाही. कारखान्यांकडील आकडेवारीनुसार, सध्याच्या एफआरपीच्या अनुषंगाने साखर उत्पादनाचा खर्च सुमारे प्रति किलो ४०.२ रुपये एवढा आहे. हे पाहता सध्याचा विक्री दर कमी आहे..Sugar Export : साखर निर्यातीचा मार्ग मोकळा होणार?.'...तर साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडेल'साखरेच्या किमान विक्री दरात सुधारणा केलेली नाही. कारखान्यांनी इथेनॉल क्षमतेमध्ये सुमारे ४० हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. असे असताना इथेनॉल दरातही सुधारणा न केल्यास कारखान्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडेल. अशा परिस्थितीमुळे कारखाने टिकू शकणार नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना ऊस बिलाचे पैसे देण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे साखर अस्थिर होऊ शकते, अशी भीती इस्माने व्यक्त केली आहे..साखर उत्पादन वाढणारसाखरेचे उत्पादन २०२५-२६ मधील हंगामात सुमारे ३४.९० दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, असे इस्माने याआधीच सांगितले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील पीक उत्पादनात सुधारणा झाल्यामुळे साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. .यंदा २० लाख टन साखर निर्यात शक्ययंदा साखरेची एकूण निर्यात सुमारे २० लाख टन होणे अपेक्षित आहे. जी गेल्या वर्षीच्या ८ लाख टनांच्या तुलनेत अधिक आहे. यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशात अतिरिक्त साखर साठा असल्याने निर्यातीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.