Currency Exchange: भारतीयांकडून डॉलरची केली जाणारी मागणी प्रचंड असल्यामुळे मागणी आणि पुरवठा या तत्त्वानुसार एक वस्तू म्हणून डॉलरचा भाव रुपयाच्या तुलनेत बराच चढा आहे. हीच गोष्ट इतर देशांच्या डॉलर्सशी असणाऱ्या विनिमय दरांबद्दलसुद्धा दिसून येते. मग प्रश्न उरतो, सगळ्या देशांकडून डॉलरची एवढी मागणी कशासाठी होत राहते आणि ती कमी होण्याची शक्यता आहे का?