Indian Economy : देशाचा विकासदर खरेच गतिमान आहे का?

India Development Rate : या लेखात आपण राष्ट्रीय उत्पन्न कसे काढतात हे समजून घेऊया.
Development Rate
Development RateAgrowon

नीरज हातेकर

Economic Growth Rate : काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर गतिमान असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. चालू आर्थिक वर्षात विकास दर ७.३ टक्क्यांवर जाईल, जो गेल्या वर्षी ७.२ टक्के होता, असे त्यात म्हटले आहे.

"Real GDP or GDP at Constant (२०११-१२) Prices in the year २०२३-२४ is estimated to attain a level of १७१.७९ lakh crore, as against the Provisional Estimate of GDP for the year २०२२-२३ of १६०.०६ lakh crore, released on ३१st May, २०२३. The growth in real GDP during २०२३-२४ is estimated at ७.३ per cent as compared to ७.२ per cent in २०२२-२३."

वर्तमानपत्रांनी हा एवढाच परिच्छेद उचलला आहे. या वरून विकास गतिमान हा निष्कर्ष नाही काढता येत. राष्ट्रीय उत्पन्न कसे काढतात हे समजून घेऊया. मूळ किमतीला मूल्यवर्धन (value added at basic prices) आणि GDP at market prices यातील फरक नीट समजून घेणे आवश्यक आहे. हे थोडे सोपे करून सांगण्यासाठी एक काल्पनिक उदाहरण घेऊ.

समजा आपल्या देशात भाकरी करणे हाच एकमेव उद्योग आहे. एकूण ज्वारीचे देशभर उत्पन्न एक किलो समजूया. ही एक किलो ज्वारी समजा १० रुपयांना विकली गेली. कोणाला विकली? तर गिरणी मालकाला. इथे मूल्यवर्धन रुपये १०. समजा गिरणीवाल्याने पीठ करून ते १२ रु. किलोने विकले. म्हणजे येथे मूल्य वर्धन २ रुपये.

समजा या १ किलो पिठाच्या ६ भाकऱ्या २० रुपयांना विकल्या. इथे मूल्य वर्धन ८ रुपये. शेतकऱ्याचे उत्पन्न १० रुपये, गिरणीवाल्याचे २ रुपये आणि भाकरी विक्रेत्याचे ८ रुपये. एकूण उत्पन्न २० रुपये, जे की ६ भाकऱ्यांचे मूल्य. याला value added at basic prices म्हणतात.

Development Rate
India Youth : तरुणांचा म्हातारा देश!

आता समजा या २० रुपयांच्या उत्पन्नावर २ रुपये कर लागला. value added at basic prices + २ रुपये कर = २२ रुपये म्हणजे GDP at market prices. रोजगार, जगण्याचा स्तर हे मोजायचे असेल, तर महत्त्वाचे value added at basic prices म्हणजे भाकऱ्या किती तयार झाल्या. कराचा भाग सरकारच्या ताळेबंदासाठी महत्त्वाचा.

आता NSSO ने जे पत्रक काढले आहे, त्यात value added at basic prices आणि GDP at market prices यातील वाढीची गेल्या वर्षीची आणि यंदाची तुलना दिलेली आहे.value added at basic prices मधील २०२२-२३ ची वृद्धी होती ७ टक्के, तर २०२३-२४ ची आहे ६.९ टक्के. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी.

पण करांची वृद्धी २०२२-२३ मध्ये १०.१ टक्के होती ती २०२३-२४ मध्ये १२.४ टक्के अपेक्षित आहे. करांच्या वाढीचा दर जास्त असल्यामुळे GDP at market prices चा अपेक्षित वाढीचा दर २०२२-२३ च्या तुलनेत (७.२ टक्के होता) तो २०२३-२४ साली ७.३ टक्के होईल असे म्हणताहेत. याला काही विकासदर गतिमान झाला वगैरे म्हणता येत नाही.

Development Rate
INDIA Alliance : ‘इंडिया’चे भवितव्य अधांतरी!

बरे, २०२३ -२४ मधील अंदाजित वाढ कशाच्या बेसिस वर काढतात? हे NSSO च्या पत्रकात annexure मध्ये दिलेले आहे. त्याकडे पाहूया.

तांदळाचे उत्पादन गेल्या वर्षी ०.९ टक्का वेगाने वाढले, तर यंदा -५.४ टक्के. कोळसा १७.२ टक्क्यांवरून १२.८ टक्के. क्रूड तेल -१.४ वरून -०.२. सिमेंट १०.९ वरून १०.३. स्टील १२.५ वरून १४.९.

व्यावसायिक वाहनांची विक्री ६७.८ वरून १.९. वैयक्तिक वाहने २४.८ वरून ९.१ टक्के. वीज निर्मिती, बँक कर्जे वाढीच्या दरात घट. उत्पादन क्षेत्रात (manufacturing) ४.९ वरून ६.४ वाढ, तसेच खाण उद्योगात सुद्धा वाढ.

थोडक्यात काय, मागणीची बाजू (demand side) अजून नाजूक आहे. खासगी खर्चाचे जीडीपीशी प्रमाण २०२१-२२ मध्ये ६१ टक्के होते ते आता ६० टक्के वर आले आहे. सरकारी महसुली खर्चसुद्धा जीडीपीच्या ११ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आलाय.

शिवाय खूप मोठ्या असंघटित क्षेत्रात झालेली पडझड मोजलीच जात नाहीये. त्यासाठी लागणारे एन्टरप्राइज सर्वे होत नाहीयेत २०१४ -१५ नंतर. भांडवली खर्च काही प्रमाणात वाढल्याचे दिसते, पण ते प्रामुख्याने सरकार भांडवली खर्च करतेय म्हणून. रस्ते बांधते आहे,

जल जीवन मिशन वगैरे राबविले जाते आहे. म्हणून सिमेंट, स्टील वगैरेला थोडा तरी उठाव आहे. पण एवढ्या पायावर ‘विकास दर गतिमान’ वगैरे मथळे थोडे अप्रस्तुत वाटतात.

महत्त्वाचे म्हणजे रोजगारनिर्मिती होत नाहीये. नरेगा खाली कामाची मागणी वाढतेच आहे. रु. ६०००० करोडची वित्तीय तरतूद संपून वरून १९००० करोड खर्च झाले आहेत.

(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ असून बंगळूरच्या अझीम प्रेमजी विद्यापीठात अध्यापन करतात.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com