कांदा पिकाच्या वाढीमध्ये आणि एकूण गुणवत्तेमध्ये पाणी देण्याची पद्धत फार परिणाम करते. त्याचप्रमाणे हवामान बदल, पाण्याची उपलब्धता या कारणांमुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरु शकतो का ते पाहण्यासाठी त्याचे फायदे आणि तोटे माहिती करुन घेणे, तसेच पाटपाणी पद्धत आणि सूक्ष्म सिचनाची तुलना करणेही आवश्यक आहे. .कांदा पिकामध्ये सूक्ष्म सिंचन का करावे?सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे पिकाच्या मुळांच्या भागातच आवश्यक तेवढे पाणी दिले जाते. मुळांजवळ कायम वाफसा स्थिती राहिल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते आणि पिकाची वाढ संतुलित होते. गादी वाफ्यावर कांदा लागवड करून सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास पाणी, खत आणि वेळ यांची मोठ्या प्रमाणात बचत होते..Onion Intercultivation: कांदा पिकातील योग्य आंतमशागतीने उत्पादनात वाढ शक्य.कांदा पिकामध्ये सूक्ष्म सिंचन का करावे?सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे पिकाच्या मुळांच्या भागातच आवश्यक तेवढे पाणी दिले जाते. मुळांजवळ कायम वाफसा स्थिती राहिल्याने अन्नद्रव्यांची उचल चांगली होते आणि पिकाची वाढ संतुलित होते. गादी वाफ्यावर कांदा लागवड करून सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास पाणी, खत आणि वेळ यांची मोठ्या प्रमाणात बचत होते..सूक्ष्म सिंचनाचे फायदेसूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे पाणी वापरामध्ये सुमारे ४० ते ५० टक्के बचत होते.ठिबकद्वारे विद्राव्य खते दिल्यास २५ टक्के खतांची बचत होते आणि खतांची कार्यक्षमता वाढते.जमीन कायम वाफसा स्थितीत राहत असल्यामुळे कांद्याचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढतात.अति आर्द्रतेमुळे होणारे करपा, कुज यांसारखे रोग कमी होतात.सूक्ष्म तुषार सिंचनामुळे दव व धुक्यापासून पिकाचे संरक्षण होते तसेच फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो..सूक्ष्म सिंचन पद्धतीचे तोटेया पद्धतीचा सुरुवातीचा खर्च जास्त असतो.ठिबक किंवा तुषार यंत्रणेची योग्य देखभाल न केल्यास नळ्या चोक होण्याची शक्यता असते.लहान शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला गुंतवणूक करणे थोडे अवघड ठरू शकते..पाटपाणी पद्धत व सूक्ष्म सिंचन यांची तुलनापाटपाणी पद्धतीत शेतात जास्त पाणी साचते, त्यामुळे मुळांना हवा मिळत नाही आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तसेच खतंही पाण्यात वाहून जातात. आणि त्यांचा कार्यक्षमपणे वापर होत नाही. त्याउलट सूक्ष्म सिंचन पद्धतीत पाणी थेट मुळांजवळ दिले जाते, त्यामुळे पाण्याची बचत होते, पिकाची वाढ समान होते आणि उत्पादन वाढते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.