Jalgaon News: खानदेशात मक्याची लागवड किंवा पेरणी यंदा स्थिर आहे. लागवड सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर झाली आहे. यातच पिकात अमेरिकन लष्करी अळीने नुकसानही सुरुवातीस झाले. पीक सध्या बऱ्यापैकी आहे. त्यात सिंचनाची लगबग सुरू आहे..थंडीचा लाभ रब्बी पिकास झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक शेतकरी ड्रीपमधून पिकास विद्राव्य खते देत आहेत. लहान मका पिकात अळीचा शिरकाव कायम आहे. शेतकरी फवारणी घेत आहेत. दोन महिन्याच्या पिकात दोन-तीनवेळा फवारणी घेऊनही अळीचा अटकाव होत नसल्याने शेतकरी जेरीस आले आहेत..Maize Crop : ‘पिवळे सोने’ मका बनले जिल्ह्याचे प्रमुख पीक .मक्याची लागवड खानदेशात यंदा कमी आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा लागवड सुमारे ८४ हजार हेक्टरवर आहे. कारण खरिपात अतिपावसातील नुकसान व कमी दर होते. यामुळे लागवड घटली. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात एक लाख तीन हजार हेक्टरवर मका पीक होते..Maize Crop : मक्याच्या शेतात सोडली जनावरे.पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या हंगामातही लागवड स्थिर राहील, किंवा वाढू शकेल, असा अंदाज होता. अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मक्यावर खर्च वाढविला आहे..दादर ज्वारी, संकरित ज्वारी, हरभरा या पिकांची पेरणी स्थिर आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी कापूस पीक काढून क्षेत्र रिकामे केले. त्यातही मका व गव्हाची पेरणी केली. डिसेंबरअखेर व जानेवारीत लागवडीच्या मका पिकात शेतकरी कीडनाशकांची फवारणी घेत आहेत. दोन महिन्याच्या पिकात तीनवेळा फवारणी घ्यावी लागली आहे. सिंचनाची लगबग सुरू आहे. सिंचनासाठी कमाल शेतकरी ठिबकचा उपयोग करीत आहेत. यामुळे मका पीक बऱ्यापैकी आहे..अनेक भागांत पीक निसवलेपीक आता अनेक भागात निसवत आहे. नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या पिकात निसवण पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सुरुवातीला मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होता. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण नंतर ही समस्या आटोक्यात आली व पीक वाढू लागले. त्यात निसवण होऊन कणसे भरण्यास सुरुवात होईल. पीक वाढल्याने त्यात आठवड्यातून दोनदा हलक्या, मध्यम जमिनीत दोन ते तीन तास सिंचन केले जात आहे. उष्णता वाढताच आठवड्यातून तीन वेळेस प्रतिदिन चार ते पाच तास सिंचन सुरू होईल. कारण पाण्याची गरज अधिक राहील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.