Akola News: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात या वर्षात हमीभावाने खरेदी झालेल्या ज्वारी खरेदी प्रकरणाचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केला असून यामध्ये ९४ खातेदार शेतकऱ्यांच्या सातबारा पेऱ्यात बदल करून सादर झाले. मूळ सातबारावर पेरा नसल्याने खरेदी केलेली ज्वारी ही दुसऱ्या शेतकऱ्याची किंवा व्यापाऱ्याची असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशयही घेण्यात आला आहे. या अहवालावर आता यंत्रणास्तरावरून कुठली कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. .दरम्यान, अकोटमधील ज्वारी खरेदीचा मुद्दा आमदार अमोल मिटकरी यांनीही पावसाळी अधिवेशनातही गाजवला होता. या अनुषंगाने नायब तहसीलदारांनी दिलेल्या अहवालानुसार, श्री संत नरसिंग महाराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण १८० खातेदारांचे सातबारा तपासणीसाठी सादर झाले होते. तर अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने १९६ सातबारा तपासणीसाठी दिले होते..Rabi Jowar Variety : रब्बी ज्वारी लागवडीसाठी वाण.या सातबारामध्ये खाडाखोड, पिकाची नोंद बदलणे, शाई बदल किंवा मूळ खातेदार यांच्यात बदल असल्याची तक्रार होती. त्यामुळे संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्या मूळ सातबारा तपासणीच्या सूचना देण्यात आल्या. त्यावर ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यात नरसिंग महाराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्रावरील एकूण २४३ खातेदारांपैकी ६९ सातबारा एडिट करून पेरा बदल केलेला असल्याचे दिसून आले. तर बाहेरील तालुक्यातील ४२ सातबारा दिसून आले. यापैकी बाहेर तालुक्यातील सातबारापैकी १० सातबारा हे एडिट केलेले आहेत..MSP Procurement: हमीभाव खरेदी प्रक्रिया जलद राबवा: मंत्री रावल.अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावरील एकूण २१८ सातबारांपैकी १५ सातबारा एडिट करून पेरा बदल केला आहे. शेतकरी कंपनी व खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर एकूण ८४ सातबारा हे एडिट करून पेरा बदल केलेले असल्याचे आढळले. हे बदल कुणी व कशासाठी केले हे तपासण्याची गरज आहे..सातबारा एडिट केलेव्यापाऱ्यांनी ज्वारी विक्री करीत शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पीक बदल, शाई बदल अशा अनेक खाडाखोडीचा खेळ मांडण्यात आला आहे. प्रत्यक्षात पेरणीच न केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर ज्वारी दाखवण्याचे काम कुणी केले हे तपासण्याची गरज आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे..चुकारे थांबवलेदरम्यान, हा अहवाल जिल्हास्तरावर पोचला असून कारवाई सुरू झाली. या प्रकरणात ४९ जणांचे चुकारे थांबविण्यात आले आहेत. यात आणखी काही कारवाई होण्याची शक्यता असून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.