Military Installation Attack: इराणच्या लष्कराने गुरुवारी (ता. २३) कुवेत व जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये कुवेतमधील पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली, एमक्यू-९ ड्रोनचा तळ, तसेच जॉर्डनमधील ‘थाड’ क्षेपणास्त्र संरक्षण रडार प्रणाली नष्ट केल्याचा दावा इराणने केला..इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्डनमधील अमेरिकी तळावर असलेले सी-रॅम रडार, तसेच इंधन साठेही लक्ष्य करण्यात आले. येथील हेलिकॉप्टर दुरुस्ती केंद्र आणि लष्करी उपकरणांचे गोदामही नष्ट केले..US-Iran Conflict: कुवेतमधील अमेरिकी तळांवर इराणचे ड्रोन हल्ले.तसेच इराणी लष्कराने ‘ऑपरेशन लाइटनिंग’ मोहिमेत कुवेतमधील तीन अमेरिकी तळांवर ड्रोनद्वारे हल्ले केल्याचा दावा केला आहे. दोहा तळावरील दारूगोळा व रसद साठे, अली अल सालेम तळावरील इंधन टाक्या आणि अरिफजान छावणीतील दारुगोळा साठा लक्ष्य करण्यात आल्याचे इराणी लष्कराने म्हटले आहे. तसेच अमेरिकी सैनिकांच्या निवासस्थाने, हेलिकॉप्टर हँगर आणि दळणवळण यंत्रणाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले..Iran US Conflict: इराणकडून अमेरिकेचे लष्करी तळ लक्ष्य.इराणने पुन्हा एकदा स्पष्ट केले, की हे हल्ले कुवेत किंवा जॉर्डनच्या सार्वभौमत्वाविरोधात नसून ते केवळ अमेरिकी लष्करी उपस्थितीवर केंद्रित होते..दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने बुधवारी सलग १२व्या दिवशी इराणवर हवाई हल्ले केल्याची माहिती दिली. या कारवाईत इराणची सागरी लष्करी क्षमता, क्षेपणास्त्र व ड्रोन साठे, किनारी भागातील टेहळणी केंद्रे आणि हवाई संरक्षण यंत्रणा लक्ष्य करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे..‘सेंटकॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी तळांवर कारवाई केली असून, इराणी बंदरांकडे जाणाऱ्या किंवा तेथून बाहेर पडणाऱ्या जहाजांवरही निर्बंध घातले आहेत. सध्या मध्यपूर्वेत ५० हजारांहून अधिक अमेरिकी सैनिक तैनात आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.