Iran Crisis Hits Basmati Rice Exports: इराणमधील अशांतता आणि वाढत्या निदर्शनांचा फटका भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीला बसला आहे. इराणमध्ये निर्यात ठप्प झाल्याने देशांतर्गत बाजारात बासमतीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय तांदूळ निर्यातदार संघाने (IREF) देशातील निर्यातदारांना, इतर देशांतील निर्यातीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. .इराणमधील अस्थिरतेमुळे व्यापार विस्कळीत झाला आहे. तांदूळ साठा पाठवण्यास उशीर होत आहे. यामुळे खरेदीदारांचा विश्वास कमी झाला आहे. याचा परिणाम आता भारतीय तांदूळ बाजारातही स्पष्टपणे दिसून येत असल्याचे आयआरईएफने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे..Basmati Exports: इराणला होणारी बासमती तांदळाची निर्यात संकटात, २ हजार कोटींचा साठा बंदरावर अडकला.गेल्या आठवडाभरात बासमती तांदळाच्या दर प्रतिकिलोमागे ५ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. इराणमधील निर्यातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी निर्यातदारांनी पश्चिम आशिया, आफ्रिका आणि युरोपसारख्या इतर बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही तांदूळ निर्यातदार संघाने केले आहे..Rice Export: तांदूळ निर्यात वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकारचा महत्त्वाचा निर्णय .आयआरईएफच्या निर्यात आकडेवारीनुसार, चालू २०२५-२६ आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यावच्या कालावधीत भारताने इराणला ४६८.१० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या बासमतीची निर्यात केली. ही निर्यात जवळपास ५.९९ लाख मेट्रिक टन एवढी होती. इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार देश आहे. पण सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे. .अमेरिकेच्या उच्च आयात शुल्काचा निर्यातीवर परिणाम नाहीइराणमधील संकटासह, भारतीय तांदूळ निर्यातदार संघाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले जाऊ शकते, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेत होणाऱ्या भारतीय तांदळाच्या निर्यातीवर आधीच ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क (टॅरिफ) लागू आहे. जे यापूर्वी १० टक्के होते. असे असूनही अमेरिकेत होणाऱ्या भारतीय तांदळाची निर्यात स्थिर राहिली आहे. हे विशेषतः भारतीय बासमती तांदळाच्या गुणवत्तेमुळे शक्य झाले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान भारतातून अमेरिकेत सुमारे २.४ लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला. उच्च आयात शुल्क आणि किमतीवर दबाव असतानाही मागणी कायम असल्याचे दिसून आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.