डॉ. कृष्णा अंभुरे.Farming Tips: खरीप हंगामातील तूर पीक सध्या जोमात आहे. पिकावर सगळीकडे बहर असून शेतकरी या पिकापासून भरपूर अपेक्षा ठेवून आहेत. परंतु काही भागामध्ये तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा आणि शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शेतकरी वेळीच किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करुन तूर पिकाचे उत्पादन वाचवू शकतात. .घाटे अळी / शेंगा पोखरणारी हिरवी अळी :तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींमध्ये हिरवी अळी अर्थात घाटे अळी ही अधिक नुकसानकारक कीड आहे. ही बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटणा, सोयाबीन, चवळी आदी कडधान्य पिकांवर मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच कपाशी, ज्वारी, टोमॅटो, तंबाखू, सूर्यफूल, करडई इत्यादी पिकांवरही तिचा प्रादुर्भाव आढळून येतो..Tur Pest Disease Management : तुरीवरील कीड-रोग नियंत्रण.जीवनमानकिडीची मादी सरासरी २०० ते ५०० अंडी तुरीच्या कोवळी पाने, देठ, कळ्या, फुले तसेच शेंगावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. नंतर शेंगांना छिद्रे पाडून आत शिरतात आणि दाणे खातात.डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान ढगाळ हवामान राहिल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढतो..घाटे अळीची नुकसान पातळीशिवारातील प्रत्येत सापळ्यात ८ ते १० पतंग २ ते ३ दिवसांत दिसल्यास घाटे अळीची नुकसान पातळी गाठली असे समजते. किंवा १ अळी प्रत्येकी १ ते २ झाड किंवा ५ ते १० टक्के नुकसान झालेल्या शेंगा आढळल्यास नियंत्रणाची गरज आहे हे समजावे..शेंगमाशीशेंगमाशी आकाराने अत्यंत लहान असून १.५ मि.मी. लांब हिरवट रंगाची असते. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. पुढील पंखाची लांबी ४ मि.मी. असते. अळी लहान, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. अळीचा तोंडाकडील भाग निमुळता असतो. या किडीची अंडी पांढऱ्या रंगाची, लंबगोलाकार असतात. तर कोषाचे आवरण तपकिरी रंगाचे आणि लंबगोलाकृती असते. कोषावरणाच्या आत कोष असून सुरुवातीस हा कोष पिवळसर पांढरा असून नंतर तपकिरी रंगाचा होतो..Rabi Jowar Pest: रब्बी ज्वारी पिकावरील मावा कीड.शेंगमाशीची लक्षणेसुरुवातीच्या काळात किडीच्या प्रादुर्भावाची शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. परंतु पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातून माशी बाहेर पडते. तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. हे दाणे खाण्यासाठी तसेच बियाणे म्हणून उपयोगी पडत नाहीत. या किडीची अळी अवस्था सुरुवातीला दाण्याचा पृष्ठभाग कुरतडून खाते. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. .जीवनमानएक अळी एका दाण्यावरच जीवनक्रम पूर्ण करते आणइ जीवनक्रम पूर्ण होईपर्यंत अळी शेंगेतच राहते. अळी अवस्था १० ते १८ दिवसांची असते. ही अळी शेंगेत जाण्यापूर्वी तिने तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडते. कोषामधून निघालेली माशी शेंगेच्या बाहेर पडते. आणि शेंगमाशीचा जीवनक्रम ३-४ आठवड्यांत पूर्ण होतो..एकात्मिक कीड व्यवस्थापन:पारंपरिक उपायवेळेवर कोळपणी व खुरपणी करावी. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. हेक्टरी १० कामगंध सापळे शेतात उभारावेत. त्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या हिरव्या अळीचे सर्वेक्षण व काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते. तसेच हेक्टरी २० पक्षिथांबे उभारावेत. .जैविक उपाय५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही हे जैविक कीटकनाशक (५०० अळ्यांचा अर्क) १ मिलि प्रति १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे. .रासायनिक उपायकिडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओंलाडल्यास, खालीलपैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची पाण्यातून फवारणी करावी.अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि, क्विनॉलफॉस (२५ ईसी) २.८ मिलि, इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४५ ग्रॅम, क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि, फ्ल्युबेन्डायअमाइड (३९.३५ एससी) ०.२ मिलि, इन्डाक्साकार्ब (१४.५ एससी) ०.७ मिलि किंवा स्पिनोसड (४५ एससी) ०.३ मिलि या किटकनाशकांची प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. ही औषधे लेबलक्लेम आहेत. शेंगा पोखरणाऱ्या किडींच्या योग्य नियंत्रणासाठी वरील कीटकनाशकांची कळी अवस्था, ५० टक्के फुलोरावस्था व त्यानंतर १५ दिवसांनी अशी तीन वेळा फवारणी केल्यास उत्तम परिणाम मिळतात..डॉ. कृष्णा अंभुरे, ८८३०७५०३९८(विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.