Washim News : राज्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि नफ्याच्या शेती व्यवसायाकडे वळविण्यासाठी शासन सातत्याने विविध योजना राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ सुरू करण्यात आले..या माध्यमातून फळबागा, फुलपिके, मसाला तसेच औषधी पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.फलोत्पादन क्षेत्र वाढविणे, उत्पादनात गुणवत्ता आणि प्रमाण सुधारणा घडवून आणणे तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा याचा उद्देश आहे..Citrus Orchard: पूरपरिस्थितीमधील संत्रा, मोसंबीच्या फळबागा वाचवण्याचे सोपे उपाय.फळपिकांसाठी आकर्षक अनुदानड्रॅगनफ्रूट : प्रति हेक्टर २,७०,००० रुपयेस्ट्रॉबेरी : प्रति हेक्टर ८०,००० रुपयेफुलपिकांसाठी अनुदानदांड्याची फुले : प्रति हेक्टर ५०,००० रुपयेकंदवर्गीय फुले : प्रति हेक्टर १,००,००० रुपयेसुटी फुले : प्रति हेक्टर २०,००० रुपये.Mango Orchard Management: अतिपावसाच्या स्थितीत आंबा बागेचे व्यवस्थापन.मसाला व औषधी पिकांसाठी अनुदानमिरची : २०,००० प्रति हेक्टरआले व हळद : ८०,००० प्रति हेक्टरऔषधी व सुगंधी वनस्पती : ६०,००० प्रति हेक्टरसंत्रा फळबाग पुनरुज्जीवन : २४,००० प्रति हेक्टरशेततळे व सिंचन अनुदानसामूहिक शेततळे : खर्च मापदंडाच्या ७५ टक्के अनुदानवैयक्तिक शेततळे (अस्तरीकरण) : खर्च मापदंडाच्या ५० टक्के अनुदान.आधुनिक शेती पायाभूत सुविधा अनुदान- अळिंबी उत्पादन प्रकल्प, हरितगृह, शेडनेट गृह, प्लॅस्टिक मल्चिंग, पॅकहाऊस, कांदाचाळ : खर्च मापदंडाच्या ५० टक्के अनुदान- संकलन केंद्र, पूर्व-शितकरण गृह, सौरऊर्जा शितखोली, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, एकात्मिक शितसाखळी प्रकल्प : खर्च मापदंडाच्या ३५ टक्के अनुदानअर्जाची प्रक्रियाया योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.