Drought Resilient : अकोला जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायात काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत पिकांची योग्य वाढ आणि उत्पादन टिकविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या एकात्मिक शेती पद्धती आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी येथे केले..विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयातर्फे आयोजित विदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या रब्बी व उन्हाळी हंगामाच्या बैठकीत ते बोलत होते..Paddy Crop Damage: सिंधुदुर्गात वादळी पावसाचा भात पिकाला फटका.कृषी विद्यापीठाने प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीचे पीकवाण उपलब्ध करून देत, उत्पादनवाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशपातळीवर वैशिष्ट्यपूर्ण असलेली १९८२ पासून सुरू असलेली शिवार फेरीची परंपरा विद्यापीठाने आजही कायम ठेवली आहे. शेतकरी, विस्तारकर्ते, युवा वर्ग आणि लोकप्रतिनिधींनी विद्यापीठाला भेट देऊन संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहनही डॉ. गडाख यांनी केले..Fruit Crop Insurance: फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन.केंद्रीय कृषी विद्यापीठा (इंफाळ) चे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. सुभाष पुरी यांनी कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात कृषी विभागाची मध्यवर्ती भूमिका असल्याचे सांगितले. विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, पीकवाण आणि कृषी यंत्रांची माहिती घेऊन ती गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचविण्याची जबाबदारी कृषी विभागाने सचोटीने पार पाडावी. कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, आत्मा आणि संलग्न विभागांनी एकत्रित प्रयत्न केल्यास आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबविता येईल, असे ते म्हणाले..आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा नैसर्गिक शेतीतज्ज्ञ डॉ. के. बी. कथेरिया यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ‘मॉडेल व्हिलेज’ संकल्पनेचे कौतुक केले. अटारी (पुणे) चे संचालक डॉ. सुब्रतो रॉय यांनी हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप स्वामी यांनी विद्यापीठाने संशोधित केलेल्या पीकवाणांमुळे उत्पादनवाढीस चालना मिळत असल्याचे सांगून या वाणांखालील क्षेत्र वाढविण्याची गरज व्यक्त केली. राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक डॉ. सुनील बोरकर यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले. शेतकरी आणि शास्त्रज्ञांमधील नियमित संवाद हा शाश्वत कृषी विस्ताराचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.