Parbhani News: रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये परभणी जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची ३ लाख ३ हजार २८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या पिकांसाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत १ लाख ८ हजारांवर शेतकऱ्यांनी १ लाख ९२ हजार २९९ विमा अर्ज दाखल करत १ लाख ४१ हजार ७२ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. .त्यात हरभऱ्याचे १ लाख १८ हजार १५८ हेक्टर, ज्वारीचे १३ हजार २८३ हेक्टर तर गव्हाचे ९ हजार ६२० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित आहे. या तीन पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या तुलनेत ४६.५१ टक्के क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण असून १ लाख ६२ हजार १९१ हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण नाही..परभणी जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी, गहू, हरभरा तसेच उन्हाळी भुईमूग या पिकांना विमा योजना लागू आहे. रब्बी ज्वारीच्या विमा अर्जाची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर गहू (बागायती), हरभरा पीकविमा अर्जासाठी १५ डिसेंबरपर्यंत होती. जिल्ह्यातील १ लाख ८ हजार २७२ शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, भुईमुगाचे मिळून १ लाख ९३ हजार ३६२ पीकविमा अर्ज दाखल केले आहेत..या शेतकऱ्यांनी १ लाख ४१ हजार ५०१ हेक्टरवरील पिकांसाठी ५ कोटी ६ लाख १५२ हजार रुपये विमा हप्ता भरून ५१८ कोटी २६ लाख ५० हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले. यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारीची ८८ हजार ३५७ हेक्टर, गव्हाची ३३ हजार ६८८ हेक्टर, हरभऱ्याची १ लाख ८१ हजार २३६ हेक्टरवर पेरणी झाली..Rabi Crop Insurance: सव्वा लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीकविमा.उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत विमा अर्ज दाखल करता येतील. प्रति हेक्टरी १०१.५० रुपये विमा हप्ता आहे. आजवर उन्हाळी भुईमुगाचे १ हजार २१ प्रस्ताव दाखल करत शेतकऱ्यांनी ४२९ हेक्टरवरील भुईमुगासाठी विमा संरक्षण घेतले आहे..Rabi Crop Insurance: खरिपानंतर शेतकऱ्यांची रब्बी हंगामातही विम्याकडे पाठ.गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ६५ हजारांवर कमी अर्जगतवर्षी (२०२४-२५) रब्बीत परभणी जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार ३२० शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ४ लाख ५९ हजार ३८ अर्ज दाखल केले होते. .त्या वेळी ३ लाख ४९ हजार ६३० हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. त्यातुलनेत यंदा २ लाख ६५ हजारांवर कमी विमा अर्ज दाखल केले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.