Satara News: संस्थेची प्रगती आणि सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद, शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल सहकार्यामुळेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. कारखान्याने गत हंगामात उसाला ३२०० रुपये प्रतिटन दिले असून या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी १०० रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहे. तसेच कामगारांना १९ टक्के बोनस देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले..शेंद्रे (ता. सातारा) येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात, मोठ्या उत्साहात झाली. या सभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव,.Sugar MSP: साखरेची विक्री किंमत किलोला ४०.२ रुपये करावी, 'इस्मा'ची मागणी, वाढत्या उत्पादन खर्चाचा दिला हवाला.सतीश चव्हाण, वनिता गोरे, जिल्हा बँकेच्या संचालक कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी कमी क्षेत्रात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली..मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार ठोस पावले उचलत आहे. मी पालकमंत्री असलेल्या लातूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४४ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे..Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून.उपाध्यक्ष सावंत यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास शेडगे यांनी आभार मानले. सभेला किरण साबळे- पाटील, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दादा शेळके, लालासाहेब पवार, विक्रम पवार, रामभाऊ जगदाळे, सुनील काटे, राजेंद्र यादव, धनाजी शेडगे, रवी कदम, चंद्रकांत घोरपडे, उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, सुरेश टिळेकर, गणपत मोहिते, गणपत शिंदे, मधुकर पवार, विजय पोतेकर, पदमसिंह फडतरे, दिलीप शेडगे, सयाजी कदम आदी उपस्थित होते..नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० लाखांची मदत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून अजिंक्यतारा कारखान्याने १० लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली असून त्याचा धनादेश कारखान्याच्या संचालक मंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सुपूर्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.