Biodiversity: ‘‘देशी बियाणांचे वाण दुर्मिळ होत चालले आहेत, त्यांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा त्याग करून विषमुक्त शेतीवर भर द्यावा आणि आपला पारंपरिक वारसा नव्या पिढीकडे सोपवावा,’’ असे आवाहन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले..राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय कृषी-धान्य महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी (ता. २३) पद्मश्री पोपेरे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या..Indigenous Seeds Conservation: देशी बियाणे संवर्धनाचा घेतलाय वसा.श्रीमती पोपेरे म्हणाल्या, ‘जुनं ते सोनं अन् खणखणतं नाणं’ असते. तकलादू गोष्टींच्या मागे न धावता पारंपरिक पिके आणि भाजीपाल्यांच्या वाणांचे जतन करून निसर्गाच्या सान्निध्यात राहणे गरजेचे आहे..Indigenous Seeds: गावरान तूर, वांगी वाणाची राष्ट्रीय पातळीवर नोंद.या प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ बसवराज रायगोंडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले आणि कृषी उपसंचालक अभिजित धेडे यांची प्रमुख उपस्थिती होती..महोत्सवाची वैशिष्ट्येप्रदर्शनात विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.महोत्सव सकाळी १० ते सायंकाळपर्यंत सर्वांसाठी खुला आहे.पहिल्या दिवशी डॉ. लालासाहेब तांबडे यांनी ''हुरडा उत्पादन व विक्री व्यवस्थापन'' आणि डॉ. परशुराम पात्रोटी यांनी ''भरडधान्य प्रक्रिया व मूल्यवर्धन'' या विषयांवर मार्गदर्शन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.