Indian Economy Forecast : देशाचा आर्थिक विकास दर २०२५.२६ मध्ये ७.४ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. सेवा क्षेत्राचा विकास दर सर्वाधिक ९.१ टक्के राहीला. तर शेतीक्षेत्राचा विकास दर मागील वर्षाच्या तुलनेत कमी होऊन ३.१ टक्क्यांवर स्थिरावेल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे..केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी २०२५-२६ चा आर्थिक पाहणी अहवाल आज (ता.२९) सादर केला. मागील वर्षभरात भारत वेगाने आर्थिक विकास करणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात ६.५ टक्के विकास दर होता. तर २०२५-२६ मधील विकास दर ७.४ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. तसेच २०२६-२७ मध्येही देशाचा विकास दर ६.८ ते ७.२ टक्क्यांच्या दरम्यान राहील, असाही अंदाज आर्थिक पाहणी आहवाल व्यक्त करण्यात आला आहे..Economic Survey: शेतीला मिळाली माॅन्सूनची साथ; पीकविमा भरपाईची मात्र बोंब .जागतिक पातळीवर अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. आर्थिक आव्हाने असतानाही भारताने विकास दर साधण्यात यश मिळवले आहे. भारताच्या अर्थिक विकासाने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून वेग घेतला. या तिमाहीतील आर्थिक विकास दर मागील सहा तिमाहीतील उचांकी ८.२ टक्के होता. त्यानंतर विकासाची गाडी रुळावरच राहीली..Economic Survey : शेतीने उभारी घेतल्याचा दावा.अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर ५० टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे देशातून होणाऱ्या निर्यातीवर परिणाम झाला. यातून सावरण्यासाठी केंद्र सकारने जीएसटी रचनेत बदल करून देशांतर्गत मागणी वाढविण्यावर भर दिला. देशातील आर्थिक उलाढाल वाढत आहे. त्यामुळे पहिल्या सुधारित अंदाजानुसार भारत २०२६ मध्ये ४ ट्रीलियन डाॅलरची अर्थव्यस्था होईल..सेवाक्षेत्राचा विकास दर जास्तआर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शेती आणि संलग्न क्षेत्राचा विकास ३.१ टक्के राहील्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतीचा विकास दर २०२४-२५ मध्ये ४.६ टक्के होता. तसेच उद्योग क्षेत्राचा विकास दर मागीलवर्षीच्या ५.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. तर सेवा क्षेत्राचा विकास दरात चालू आर्थिक वर्षात चांगली वाढ झाली. सेवा क्षेत्राचा विकास दर मागील आर्थिक वर्षात ७.२ टक्के होता तो चालू आर्थिक वर्षात ९.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.