New Delhi: यंदाच्या चांगल्या पावसामुळे रब्बी पीक क्षेत्रात वाढ झाली असून, यामुळे हिवाळी पिकांसाठी खतांची मागणी वाढली आहे. परिणामी, चालू आर्थिक वर्षात भारतात खत आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे देशाचा खतांवरील खर्च सुमारे १८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज केंद्र सरकार आणि खत उद्योगातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. .‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार, यंदा युरिया आणि डीएपीच्या (डाय-अमोनियम फॉस्फेट) आयातीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे एकूण खत आयातीवरील खर्च वाढत चालला आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतात होत असलेली खत आयात मागील वर्षाच्या तुलनेत ७१ टक्क्यांनी वाढली असून येत्या तिमाहीत त्यात आणखी पाच टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. त्यासाठीचा खर्च १३.९८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला असल्याचे आकडेवारीवरून दिसते..Fertiliser Import: यंदा खत आयात ७६ टक्क्यांनी वाढणार, खर्च विक्रमी १८ अब्ज डॉलर्सवर?.मार्चच्या तिमाहीत युरिया आणि इतर खतांची आणखी मोठी खेप देशात दाखल होण्याची शक्यता आहे. यासाठी आणखी किमान ४ अब्ज डॉलर्स खर्च येऊ शकतो. यामुळे चालू आर्थिक वर्षातील खतांवरील आयातीचा एकूण खर्च सुमारे १८ अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यता अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे. मॉन्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस पडला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ४९ टक्के अधिक राहिले..यामुळे गहू आणि हरभरा यांसारख्या हिवाळी पिकांच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा मिळाला. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवारीनुसार, देशात रब्बी हंगामातील पिकांनी ६५२.३ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. हे पीक क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.३ टक्क्यांनी अधिक आहे.‘‘या वर्षी झालेला सलग चांगला पाऊस झाल्याने भात पीक क्षेत्र वाढले आहे. यामुळे युरियाचा वापर वाढला,’’ असे खत उत्पादकांची संस्था ‘फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष एस. शंकरसुब्रमण्यम यांनी सांगितले. मक्यामुळेही युरियाचा वापरही वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे..Fertilisers Rate : खते, अवजारांवरील ‘जीएसटी’मुळे शेतकरी आला घाईला, ठिबक सिंचन साहित्य विक्रीतही घट.यंदा युरिया आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६१ टक्क्यांनी वाढून ९० लाख मेट्रिक टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर डीएपी आयात ५२ टक्क्यांनी वाढून ७० लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाजही शंकरसुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. भारतात प्रामुख्याने ओमान, रशिया, चीन, सौदी अरेबिया आणि मोरोक्को येथून युरिया आणि डीएपीची आयात केली जाते..यंदा शेतीसाठी खतांचा वापर गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान ५ टक्के वाढू शकतो. कारण, चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी प्रोत्साहन मिळाले.पी. एस. गहलौत, व्यवस्थापकीय संचालक, इंडियन पोटॅश कंपनी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.