डॉ. संजय भावे भारतामध्ये अनादीकाळापासून नारळाला धार्मिक, औषधी तसेच औद्योगिक महत्त्व आहे. जागतिक पातळीवर नारळ उत्पादनामध्ये फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि भारत हे देश अग्रेसर आहेत. भारतामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये विशेषतः केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यात नारळाची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. .भारतामध्ये १९५० मध्ये नारळ लागवडीचे एकूण क्षेत्र ६२६.५ हजार हेक्टर होते. त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३ मध्ये नारळ लागवडीचे क्षेत्र २२७८ हजार हेक्टरपर्यंत पोहचले. उत्पादकतेमध्येही चांगली वाढ झाली असून प्रति हेक्टरी ९,०१८ नारळ फळांचे उत्पादन मिळते.नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणून ओळखतो. नारळापासून तयार होणाऱ्या विविध औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीमधून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. नारळ उत्पादनात वाढ करून मूल्यसाखळी तयार करणे आणि त्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला मोठा वाव आहे. .Coconut Farming : बेभरवशाच्या मासेमारीला मिळाला नारळ उद्योगाचा पर्याय.उपलब्ध साधनसामग्रीचा वापर, सुधारित तंत्रज्ञान आणि एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून नारळ उत्पादन वाढण्यासाठी मोठी संधी आहे. पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या बागेतून उत्पन्नवाढीसाठी नारळ आधारित एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. यामध्ये एकात्मिक आणि काटेकोर पद्धतीने पीक व्यवस्थापन, मसाला पिके, फुलपिके, फळझाडांची आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून लागवडीला प्राधान्य द्यावे. .नारळ बागेमध्ये गांडूळ खत निर्मिती तसेच कुक्कुटपालन असे पूरक उद्योग करून आपण शाश्वत उत्पन्नवाढ करू शकतो. नारळापासून विविध मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती आणि विक्री करणे या गोष्टी नव्याने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. नारळ उत्पादन घेताना लागवडीचे परिपूर्ण तंत्र अवलंबणे गरजेचे आहे. योग्य जातींची निवड, शिफारशीत अंतरावर लागवड, खते आणि पाणी व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन या बाबींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. याबाबतचे तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. .Coconut Farming: कापूस पट्ट्यात नारळाचे यशस्वी उत्पादन.नारळ हे बागायती पीक असून यास औद्योगिक महत्त्व मोठे आहे. खोबरे, पाणी, नीरा याचबरोबरीने सोडणे, करवंटीवर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणावर मूल्यवर्धन शक्य आहे. यातून रोजगार निर्मिती तसेच परकीय चलन मिळण्याची चांगली संधी आहे. अलीकडच्या काळामध्ये कृषी पर्यटन विस्तारीत आहे. किनारपट्टी भागात नारळ बागेवर आधारीत कृषी पर्यटनासाठी मोठा वाव आहे. .नारळ आधारित उद्योगांमध्ये मोठा वाटा हा काथ्या उद्योगाचा आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर अर्थकारणाला गती देण्यासाठी सहकारी तत्त्वावर काथ्या उद्योगाला संधी आहे. नारळ बागायतीमध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता आहे. पडीक जमीन, पाणलोट क्षेत्र, नदी आणि खाडी किनाऱ्याचा भाग, बांध, कालवे परिसरात नारळ लागवडीस वाव आहे. या माध्यमातून नारळ आधारित शाश्वत शेती पद्धती चांगल्या प्रकारे विकसित होईल.(लेखक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.