Fresh Grapes Export: भारतीय ताज्या द्राक्षांच्या निर्यातीसाठी व्हिएतनामची बाजारपेठ खुली झाली असून, ६ मे २०२६ पासून निर्यातीला अधिकृत सुरुवात झाली आहे. कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) १३ मे रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले..व्हिएतनामच्या ‘प्लँट प्रॉडक्शन अँड प्रोटेक्शन डिपार्टमेंट’ने (पीपीडी) २८ एप्रिल रोजी भारतीय द्राक्षांना आपल्या बाजारपेठेत प्रवेश मंजूर केल्याची माहिती दिली होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हे पत्र १ मे रोजी ‘अपेडा’कडे पाठविले. या निर्यातीसाठी ‘सिस्टम ॲप्रोच’ पद्धत बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष बागेपासून कंटेनरपर्यंत प्रत्येक टप्प्यावर निश्चित नियम आणि तपासणी प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी लागणार आहे..Jamun Season: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जांभूळ हंगामाला धीम्या गतीने प्रारंभ.निर्यातीदरम्यान कंटेनरमधील द्राक्षांच्या गराचे तापमान सलग १५ दिवस १.१ अंश सेल्सियस ठेवणे आवश्यक राहणार आहे. ‘इन-ट्रान्झिट कोल्ड ट्रिटमेंट’ म्हणून ओळखली जाणारी ही प्रक्रिया फळमाशी नियंत्रणासाठी महत्त्वाची मानली जाते..Sangli Grape Export: सांगलीच्या दहा हजार टन द्राक्षांची परदेशात निर्यात.तसेच व्हिएतनामने लागू केलेल्या फायटोसॅनिटरी आयात अटींचे (पीआयआर) पालन करणेही निर्यातदारांसाठी अनिवार्य राहणार आहे..नवीन बाजारपेठ उपलब्ध‘अपेडा’ने इच्छुक निर्यातदारांना या नव्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नाशिक, सांगली आणि सोलापूर भागांतील द्राक्ष उत्पादक व निर्यातदारांना नवीन निर्यात बाजारपेठ उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.