Wheat Procurement Target India: केंद्र सरकारने २०२६-२७ रब्बी विपणन हंगामात ३०३ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने (DFPD) नुकतीच राज्यातील अन्न विभागांच्या सचिवांची बैठक घेतली. त्यात यंदाच्या हंगामातील गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. .गव्हाची बहुतांश खरेदी एप्रिल ते जून दरम्यानच्या कालावधीत केली जाते. तर इतर शेतपिकांची खरेदी संपूर्ण हंगामात मार्चपर्यंत करण्यात येते. यंदाच्या २०२५-२६ मधील रब्बी पीक हंगामातून ७६ लाख टन धान खरेदीचा (तांदळाच्या हिशोबाने) अंदाज आहे. तर राज्यांकडून सुमारे ७ लाख ७९ हजार टन भरडधान्य खरेदीचा अंदाज बांधण्यात आला आहे..यंदा ३३४.१ लाख हेक्टर क्षेत्र गहू पिकाने व्यापले आहे. त्यात पोषक हवामानामुळे गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ११७९.४ लाख टनांहून अधिक म्हणजे १,२०० लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Wheat Production: योग्य व्यवस्थापनाने गहू उत्पादनात क्रांती शक्य.१ एप्रिल २०२६ पर्यंत भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) सुमारे १८२ लाख टन गहू साठा राहील, असा अंदाज आहे. हा साठा देशांतर्गत मागणीच्या पूर्ततेसाठी पुरेसा पुरवठा असेल, असेही सुनिश्चित करण्यात आले आहे..Wheat Crop Advisory: उष्णतेमुळे गहू पिकात दाणे भरण्याची चिंता, पालाश का आहे महत्त्वाचे?.केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये गहू आणि त्यापासूनच्या उत्पादनांच्या निर्यातीवरील चार वर्षांपासून असलेली बंदी उठवली. गव्हाच्या २५ लाख टन आणि गहू पिठाच्या ५ लाख टन निर्यातीस मान्यता दिली होती..पाच राज्यांत तुकडा तांदूळ पुरवण्याचा प्रकल्पदरम्यान, १० टक्क्यांपर्यंत तुटलेल्या तांदूळ पुरवठ्यासाठी सरकार पाच राज्यांमध्ये एक प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्पदेखील राबवत आहे. तसेच आंध्र प्रदेशात अन्नधान्याच्या पॅकेजिंगवर क्यूआर कोड टॅगिंगचा प्रायोगिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे. तर इतर राज्यांमध्येही हा प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.