India US Trade Deal Farmers Protest: भारत-अमेरिका कराराला शेतकरी संघटनांचा विरोध कायम आहे. हा करार 'शेतकरीविरोधी' असून तो रद्द करण्याची मागणी संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने केली आहे. तसेच ९ मार्चपासून पुन्हा सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी देशभरात सार्वजनिक सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे..विविध शेतकरी संघटनांचे नेतृत्त्व करणाऱ्या या संघटनेने घेतलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेनंतर एक निवेदन जारी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या करारावर स्वाक्षरी न करण्याबाबत निर्देश द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे..या करारावरुन त्यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी शेती आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्र बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी खुले करून भारताची आत्मनिर्भरता आणि सार्वभौमत्वाशी तडजोड केली. यासाठी वाणिज्यमंत्र्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी केली जाईल. याबाबत बैठका घेऊन राष्ट्रपतींना खुले पत्र पाठवले जाणार असल्याचे 'एसकेएम'ने म्हटले आहे..India US Trade : भारत-अमेरिका व्यापार कराराचा शेतकऱ्यांना फायदा; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दावा.यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, अर्थ मंत्रालयाकडून केरळ सरकारला पाठवलेले पत्र तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणीही केली आहे. या पत्रातून केरळ सरकारला सध्याच्या बोनस धोरणाचा आढावा घेण्यास तसेच गहू आणि भातावरील बोनस योजना बंद करण्याबाबत विचार करण्यास सांगण्यात आले होते. "कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून डीओ पत्रावर स्वाक्षरी करणारे खर्च सचिव व्ही व्हुअलनम आयएएस यांना पदावरून हटवण्याची टाकण्याची मागणी केली जाईल," असे एसकेएमने नमूद केले आहे..India US Trade Deal: व्यापार करार की लोटांगण?.एसकेएमचे राज्य समन्वय समित्यांचे शिष्टमंडळ २७ फेब्रुवारी रोजी अथवा त्यानंतर संबंधित मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी घेऊन हा करार रद्द करण्याची विनंती करेल, असे शेतकरी संघटनेने म्हटले आहे..डिओ पत्र मागे घेण्याची विनंती केली जाईल, जे राज्य सरकारांच्या आर्थिक स्वायत्ततेवर घाला घालणारे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास न्याय्य मोबदला मिळण्याच्या हक्काच्या विरोधात असल्याचे नमूद करण्यात आल आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना राज्याच्या संघराज्यीय हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली जाईल, असे एसकेएमने पुढे म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.