India Urea Tender: भारताच्या युरिया निविदेकडे जागतिक खत बाजाराचे लक्ष
Global Fertilizers Market: जागतिक खत बाजारात सध्या व्यवहार मंदावले असून, सर्वांचे लक्ष भारताच्या पुढील युरिया निविदेकडे लागले आहे. भारत किती युरिया खरेदी करतो, यावरच आगामी काळातील जागतिक किमतींची दिशा ठरणार असल्याचे ‘एफएओ’च्या ॲग्रिकल्चरल मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या (AMIS) अहवालात म्हटले आहे.