India Urea Imports More Than Double: देशांतर्गत उत्पादनात घट झाल्याने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत भारताच्या युरिया आयातीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत देशात ७१.७ लाख टन आयात करण्यात आली. यातून देशातील शेतकऱ्यांची मागणीची पूर्तता करण्यासाठी परदेशातून होणाऱ्या पुरवठ्यावरील वाढते अवलंबित्व अधोरेखित होते, असे खत उद्योगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे..फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया (FAI) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर २०२४-२५ दरम्यानच्या कालावधीत युरिया आयात १२०.३ टक्क्यांनी वाढून ७१.७ लाख टन झाली. याआधीच्या वर्षी याच कालावधीत युरिया आयात ३२.६ लाख टन होती. .याच कालावधीत देशांतर्गत युरिया उत्पादन ३.७ टक्क्यांनी कमी होऊन ते १९७.५ लाख टनांपर्यंत खाली आले. तर एकूण युरिया विक्री २.३ टक्के वाढून २५४ लाख टन झाली होती, असे आकडेवारीवरून दिसते.."समन्वय ठेवून केलेल्या नियोजनाद्वारे आम्ही विक्रीत वाढ साध्य केली असली तरी, तरी विशेषत: युरिया आणि डीएपी सारख्या खतांच्या आयातीबाबत मोठ्या प्रमाणात असलेले अवलंबित्व धोरणात्मक पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करते,” असे एफएआयचे अध्यक्ष एस. शंकरसुब्रमण्यम यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे..Urea linking: युरिया लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.एतट्या नोव्हेंबरमध्ये युरिया आयातीत ६८.४ टक्क्यांनी वाढ झाली. या महिन्यात १३.१ लाख टन युरिता आयात करण्यात आला होता. या तुलनेत नोव्हेंबर २०२४ मध्ये ७.८ लाख टन युरिया आयात केली होती. नोव्हेंबरमधील युरियाची विक्री याआधीच्या तुलनेत ४.८ टक्क्यांनी वाढून ३७.५ लाख टन झाली..Urea Shortage: बाजारात ‘युरिया’चा कृत्रिम तुटवडा.'डीएपी' आयातीवरील अवलंबित्वही वाढलेयुरियासोबतच मातीतील महत्त्वाचा पोषक घटक असलेल्या डाय-अमोनियम फॉस्फेट म्हणजे 'डीएपी'ची आयातीवरील अवलंबित्वही वाढत असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत विक्री ७१.२ लाख टन एवढी स्थिर राहिली. असे असले तरी, एकूण झालेल्या पुरवठ्यात डीएपीचा वाटा ६७ टक्के आहे. यात गेल्या वर्षीच्या ५६ टक्क्यांच्या तुलनेत वाढ दिसून आली. दरम्यान, देशांतर्गत डीएपी उत्पादनात ५.२ टक्क्यांनी घट झाली असून, ते २६.८ लाख टनांर्पंयत खाली आले आहे..पीक पोषण काळात खतांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आयातीवर भर देण्यात आला. भारताची ही धोरणात्मक भूमिका या आयात वाढीतून दिसून येते, असे एफएआयने नमूद केले आहे..एनपीके उत्पादनात १३.८ टक्के वाढदरम्यान, एनपीके खतांनी चांगली वाढ दर्शवली आहे. एनपीके उत्पादनात १३.८ टक्क्यांनी वाढ झाली असून ते ८१.५ लाख टनांवर पोहोचले आहे. तर आयातीत जवळपास दुप्पटीने वाढ होऊन ती २७.२ लाख टन झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यानच्या कालावधीत विक्री १०३.८ लाख टनांवर स्थिर राहिली. याच कालावधीत पोटॅश विक्री ८.६ टक्क्यांनी वाढली. हा विक्रीचा आकडा १५.५ लाख टन एवढा आहे. .तर सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) विक्री १५ टक्क्यांनी वाढून ४१.६ लाख टनांवर पोहोचली. तर उत्पादन ९.५ टक्क्यांनी वाढून ३९.७ लाख टन एवढे झाले. .सरकार युरियावर किती देते अनुदान?केंद्र सरकार युरियावर मोठे अनुदान देते. १ नोव्हेंबर २०१२ पासून त्याच्या प्रति ४५ किलो पिशवीचा दर २४२ रुपये (नीम कोटिंग शुल्क आणि कर वगळून) कायम आहे. युरियाला नव्या युरिया धोरणाअंतर्गत नियंत्रित वस्तू म्हणून वर्गीकृत केले आहे. यामुळे त्याला फॉस्फेटिक खतांच्या तुलनेत अधिक अनुदान दिले जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.