Export Policy: भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) १५ जुलै २०२६ पासून अधिकृतपणे अमलात आला आहे. औद्योगिक आणि सेवा क्षेत्रांना या करारातून मोठा लाभ अपेक्षित असला, तरी कृषी क्षेत्राबाबत ‘यूके’ने सावध भूमिका कायम ठेवली आहे. भारताच्या प्रमुख कृषी उत्पादनांना सीमाशुल्क सवलतींपासून दूर ठेवत, ‘यूके’कडून स्वतःच्या उच्च मूल्याच्या उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यात आली आहे..भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होणारा तांदूळ, साखर, डुकराचे मांस, चिकन आणि अंडी या उत्पादनांवरील आयात शुल्कात ‘यूके’ने कोणतीही कपात केलेली नाही. स्वस्त आयातीमुळे स्थानिक शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे..India UK FTA: भारत-इंग्लंड मुक्त व्यापार कराराची आजपासून अंमलबजावणी होणार .याउलट, ‘यूके’मधील सामन, कॉड आणि कोकराचे मांस यांना भारतीय बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश देण्यात आला आहे. भारतातील उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांना लक्षात घेऊन या उत्पादनांसाठी बाजारपेठ खुली करण्यात आल्याचे मानले जात आहे..India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित.करारात सीमाशुल्काबरोबरच गुणवत्ता आणि आरोग्यविषयक निकषांनाही महत्त्व देण्यात आले आहे. भारतीय कृषी आणि पशुधन उत्पादनांसाठी ‘यूके’ने ‘अँटी-मायक्रोबियल रेसिस्टन्स’ (एएमआर), प्राणी संगोपन आणि अन्नसुरक्षा यासंदर्भातील कठोर अटी कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे पशुपालनातील प्रतिजैविकांचा वापर आणि प्राणी आरोग्यविषयक निकषांचे पालन भारतीय निर्यातदारांसाठी बंधनकारक राहणार आहे..यूकेच्या ‘इम्पॅक्ट असेसमेंट’ अहवालानुसार, भारताला कृषी क्षेत्रात व्यापक शुल्कसवलती दिल्यास केनियातील भाजीपाला, नामिबियातील मांस आणि बांगलादेशातील मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या देशांच्या व्यापारहितांचा विचार करून कृषी क्षेत्रातील सवलती मर्यादित ठेवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे..आव्हाने कायमचहा मुक्त व्यापार करार द्विपक्षीय व्यापारासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी कृषी क्षेत्रात ‘यूके’ने संरक्षणात्मक धोरण कायम ठेवले आहे. त्यामुळे भारतीय कृषी निर्यात वाढविण्यासाठी जागतिक दर्जाची आरोग्य-सुरक्षा, वनस्पती व प्राणी आरोग्य (एसपीएस) मानके आणि गुणवत्ता निकषांची पूर्तता करणे हेच पुढील मोठे आव्हान ठरणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.