India Sugar Production Rises: देशातील साखर उद्योगाची २०२५ वर्षातील ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उतारा यासारख्या प्रमुख घटकांवर आधारित कामगिरी २०२४ च्या तुलनेत चांगली दिसून आली. विशेष म्हणजे, देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील ऊस पिकाला रोगांचा प्रादुर्भाव, अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला असतानाही ही सुधारणा झाली आहे. तर देशातील साखर उत्पादन ११८.३० लाख टनांवर पोहोचले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत उत्पादन ९५.६० लाख टन होते. .राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (एनएफसीएसएफ) च्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंत ४९९ कारखान्यांनी हंगाम सुरु केला आहे. त्यांनी आतापर्यंत १,३३९.२१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १,१०१.८७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले होते. यंदा गाळपाचे प्रमाण अधिक आहे..Organic Sugar Export: आता परदेशात जाणार भारताची सेंद्रिय साखर, ५० हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही ऊस उत्पादन घेणारी तीन प्रमुख राज्ये आहेत. या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राची कामगिरी अव्वल राहिली. ३१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील ५५६.५७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. .Sugar Industry Crisis: कारखान्यांची स्पर्धा साखरेच्या मुळावर.यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून तो ८.७५ टक्के एवढा आहे. गेल्या हंगामात उतारा ८.६ टक्के होता. दरम्यान, उत्तर प्रदेशने साखर उताऱ्यात महाराष्ट्राला मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशमधील ३१ डिसेंबरपर्यंत गाळप केलेल्या उसाचा सरासरी साखर उतारा ९.७ टक्के एवढा आहे..उत्तर प्रदेशातील ११९ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. त्यांनी आतापर्यंत ३६७.५३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांचा ऊस गाळपाचा वेग किचिंत अधिक आहे..कर्नाटकातील ७५ कारखान्यांनी २७९.७५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. कर्नाटकातील साखरेच्या उताऱ्यात गेल्या हंगामातील ८.५ टक्क्यांच्या तुलनेत ७.९ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. पण त्यांचे साखर उत्पादन गेल्या हंगामातील २०.५५ लाख मेट्रिक टनांच्या तुलनेत २२.१ लाख मेट्रिक टनापर्यंत वाढले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.