ठळक मुद्देतांदळाच्या साठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के वाढतांदळाच्या अधिक निर्यातीस चालना मिळणारगव्हाचाही साठा ४ वर्षांच्या उच्चांकावर.Rice Stocks : देशातील सरकारी गोदामांत तांदळाच्या साठ्यात सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के वाढ झाली आहे. तर गव्हाचीही शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे. यामुळे गव्हाचा साठा ४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, असे बुधवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीवरुन दिसून आले. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे..भारत हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. यंदा तांदळाचा विक्रमी साठा असल्याने तांदळाच्या अधिक निर्यातीस चालना मिळणार आहे. तर गव्हाच्या वाढलेल्या साठ्यामुळेही सरकारला या वर्षाच्या अखेरीस खुल्या बाजारातील विक्रीच्या माध्यमातून संभाव्य दरवाढ रोखणे शक्य होईल..Rice Farming: पावसामुळे भातशेती बहरली.१ सप्टेंबरपर्यंत, भाताचा राज्य आरक्षित साठा एकूण ४८.२ दशलक्ष मेट्रिक टन एवढा विक्रमी होता. जो १ जुलैसाठी सरकारने निश्चित केलेल्या १३.५ दशलक्ष टनांच्या उद्दिष्टापेक्षा खूपच अधिक आहे..१ सप्टेंबरपर्यंत देशातील गव्हाचा साठा ३३.३ दशलक्ष टन होता. हा साठा सरकारने निश्चित केलेल्या २७.६ दशलक्ष टन उद्दिष्टापेक्षा खूपच अधिक होता, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.."देशातून तांदळाची निर्यात अधिक होत आहे. भारताची या वर्षी मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात करण्याची तयारी आहे. गेल्या वर्षी विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तांदूळ साठा अधिक आहे," असे डीलर सांगतात..India Rice Export : बांगलादेशमुळे १४ टक्क्यांनी वाढले तांदळाचे भाव; भारतातून वाढली तांदूळ निर्यात.जागतिक बाजारात तांदळाच्या निर्यातीत भारताचा वाटा सुमारे ४० टक्के एवढा आहे. भारताने मार्च २०२५ मध्ये तांदूळ निर्यातीवरील निर्बंध हटवले होते..निर्यात वाढणारभारतातून तांदळाची निर्यात सुमारे २५ टक्के वाढून यावर्षी विक्रमी २२.५ दशलक्ष टन होण्याची अपेक्षा तांदूळ निर्यातदार संघटनेने व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील भाताची ऑक्टोबरपासून आवक होण्यास सुरुवात होईल. यामुळे सरकारी एजन्सींसमोर साठ्याची व्यवस्था करण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते, असे एका डीलरने सांगितले..गव्हाचाही साठा अधिकगेल्या तीन वर्षांत, गव्हाचा साठा कमी असणे हा सरकारसाठी चिंतेचा विषय होता. पण आता पुरेसा पुरवठा आहे. यामुळे सणासुदीत दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तो खुल्या बाजारात पाठवला जाऊ शकते, असे मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले. सामान्यतः ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळी सणाच्या कालावधीत गव्हाची मागणी वाढते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.