रब्बी पीक पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी आघाडीवर गहू पेरणी क्षेत्र सर्वाधिक १९ टक्क्यांनी आघाडीवर एकूण पीक लागवड क्षेत्र गेल्या वर्षीच्या २७२.७८ लाख हेक्टरच्या तुलनेत ३०६.३१ लाख हेक्टरवर पोहोचले कडधान्ये पेरणी क्षेत्र जवळपास ८ टक्क्यांनी आघाडीवरमक्याचे दर घसरले असतानाही या पिकाचे पेरणी क्षेत्र विस्तारले.Rabi Crop Sowing: देशातील रब्बी पीक पेरणीने वेग घेतला आहे. २१ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील एकूण रब्बी पीक पेरणी क्षेत्र १२ टक्क्यांनी आघाडीवर आहे. ज्यात गहू पेरणी क्षेत्र सर्वाधिक १९ टक्क्यांनी आघाडीवर आहे. .केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एकूण पीक लागवड क्षेत्र गेल्या वर्षीच्या २७२.७८ लाख हेक्टरच्या तुलनेत ३०६.३१ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. सर्वसामान्यपणे रब्बी पिकाखालील क्षेत्र ६३७.८१ लाख हेक्टर आहे. या आठवड्याच्या अखेरीस, या सामान्य क्षेत्राच्या तुलनेत किमान ५० टक्के लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे..Rabi Season Crop Planning : कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजन.ऑक्टोबरमध्ये नैऋत्य मोसमी म्हणजे मान्सूनच्या पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा तयार झाला आहे. त्याचबरोबर ईशान्य मान्सूनमुळे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिरिक्त पाऊस पडला. या दोन प्रमुख कारणांमुळे रब्बी पीक क्षेत्राने आघाडी घेतली असल्याचे दिसून आले आहे..पावसाचे प्रमाण अधिक राहिलेभारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात १९ नोव्हेंबरपर्यंत आणि १ ऑक्टोबरपासून मान्सूननंतरच्या कालावधीत पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा २७ टक्के अधिक राहिले. विशेषतः वायव्य भागात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा दुपटीने अधिक राहिले. तर मध्य भागात ५२ टक्के पाऊस अधिक पडला. .दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे देशातील प्रमुख धरणे त्यांच्या क्षमतेच्या जवळपास ९० टक्के भरली आहेत. याव्यतिरिक्त, प्रमुख पिकांच्या उच्च किमान आधारभूत किमती (MSP) मुळे शेतकऱ्यांना लवकर पेरणी करण्यास आणि खरीप पिकांची लवकर कापणीस मदत मिळाली..Rabi Crop Selection: जमिनीच्या प्रकारानुसार रब्बीच्या पिकाची निवड कशी कराल?.गहू पेरणी आघाडीवरगहू पेरणी क्षेत्र १२८.३७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०७.७९ लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली होती. आतापर्यंत रब्बीतील मुख्य तृणधान्य पिकाच्या ३१२.३५ लाख हेक्टरच्या सामान्य क्षेत्राच्या तुलनेत सुमारे एक तृतीयांश क्षेत्र व्यापले गेले आहे. भात पीक क्षेत्राने ०.६७ लाख हेक्टरने किंचित आघाडी घेऊन ते ८.२६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे..कडधान्ये पेरणी क्षेत्र ८ टक्क्यांनी आघाडीवरकडधान्ये पेरणी क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ८ टक्क्यांनी आघाडीवर असून ते ७३.३६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. रब्बीतील एकूण कडधान्ये पिकांमध्ये सुमारे ७० टक्के वाटा हरभरा पिकाचा आहे. यंदा हरभरा क्षेत्र ९ टक्क्यांनी आघाडीवर आहे. या पिकाने ५२.७१ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. कडधान्यातील आणखी एक मोठे पीक असलेले मसूर पीक ४४ हजार हेक्टरने आघाडीवर आहे. मसूर पिकाचा ९.०१ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. कुळीथ आणि वाटाणा पेरणीनेदेखील आघाडी घेतली आहे. परंतु उडीद, मूग आणि इतर कडधान्यांची पेरणी पिछाडीवर आहे..मक्याचे क्षेत्रही आघाडीवरमक्याचे भाव सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा घसरले असतानाही त्याचे पीक क्षेत्र वाढतच आहे. एकूणच, पौष्टिक तृणधान्ये क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी आघाडीवर असून १९.२९ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका पीक पेरणी ६.५७ लाख हेक्टरवर झाली आहे. तर तृणधान्यांमध्ये सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या ज्वारी पीक पेरणी क्षेत्र ८.९९ लाख हेक्टरवर व्यापले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील तुलनेत हे क्षेत्र ०.५६ लाख हेक्टरने आघाडीवर आहे. बार्ली, बाजरी, छोटी बाजरी आणि नाचणी पीक पेरणीही आघाडीवर आहे. .मोहरी पेरणी क्षेत्र ६ टक्क्यांनी आघाडीवरमोहरी क्षेत्र ६ टक्क्यांनी आघाडीवर असून ७३.८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मोहरी पेरणी ६९.५८ लाख हेक्टरवर झाली होती. मोहरी हे तेलबियांमध्ये सर्वाधिक घेतले जाणारे पीक आहे. एकूणच, तेलबियांखालील क्षेत्र ५.४ टक्क्यांनी आघाडीवर असून ७६.६४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पण भुईमूग क्षेत्र १५ हजार हेक्टरनी पिछाडीवर असून पेरणी १.१२ लाख हेक्टरवर झाली आहे. इतर तेलबिया पिकांनीही आघाडी घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.