Water Storage In India’s 166 Major Dams: गेल्या आठवड्यात देशातील काही भागापुरताच पाऊस मर्यादित राहिल्याने या आठवड्यात १६६ प्रमुख धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांच्या खाली आला. जानेवारी आणि मार्च दरम्यान कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने काही धरणांतील पाणी पातळी आणखी खाली जाऊ शकते, असे केंद्रीय जल आयोगाने (CWC) म्हटले आहे..जल आयोगाच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात पाणीसाठा १८३.५६५ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत १४२.१७७ अब्ज घनमीटर (BCM) आहे. म्हणजेच हा पाणीसाठा ७७.४५ टक्के एवढा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५.५ टक्के पॉइंट्सने अधिक आणि मागील १० वर्षांतील सामान्य पातळीच्या तुलनेत २२.५ टक्के पॉइंट्सने अधिक आहे..भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, दक्षिण आणि वायव्येचा द्वीपकल्पीय काही भाग वगळता, गेल्या आठवड्यात अन्य कुठेही पाऊस पडला नाही..Water Conservation: लोकसहभागातून उभारले जलसंधारणाचे मॉडेल.देशाच्या पश्चिम आणि मध्य भागातील धरणांत ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. तर उर्वरित धरणांमध्ये त्याहून कमी साठा आहे. उत्तर भागात असलेल्या ११ धरणांमध्ये, १९.८३६ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत १४.२७२ अब्ज घनमीटर पाणीसाठा म्हणजे ७१.९५ टक्के एवढा आहे..Water Leakage: पारगाव-नागरगाव बंधाऱ्यातून गळती.पूर्वेकडील २७ धरणांतील पाणीसाठा क्षमता २१.७५९ अब्ज घनमीटर आहे. सध्या या धरणांत १५.१२७ अब्ज घनमीटर (६९.५२ टक्के) पाणीसाठा आहे. पश्चिमेकडील ५३ धरणांमध्ये ३८.०९४ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत ३३.०४० अब्ज घनमीटर म्हणजेच ८६.७ टक्के पाणीसाठा आहे..मध्य भारतातील २८ धरणांत ३९.०६१ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. या सर्व धरणांतील क्षमता ४८.५८८ अब्ज घनमीटर असून, सध्याचा पाणीसाठा हा ८०.३९ टक्के आहे. दक्षिणेतील ४७ धरणांत ५५.२८७ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत ४०.६७६ अब्ज घनमीटर (७३.५७ टक्के) पाणीसाठा आहे..सध्या ८ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. तर ४२ धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. तर १३ धरणांमध्ये पाणीसाठा ४० टक्क्यांहून कमी आहे. दरम्यान, जानेवारी-मार्च दरम्यान कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे धरणांतील पातळीत आणखी घट होऊ शकते, असे जल आयोगाने म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.