पूजा प. थुळ, डॉ. अभिमान सावंत, मंजित खताळवाढते शहरीकरण, अनिर्बंध जंगलतोड, बदलते जीवनमान, शेतामध्ये होत असलेल्या विविध रासायनिक घटकांचा अतिरेकी वापर यामुळे निसर्गाचा नाजूक समतोल ढासळत चालला आहे. आकाश, वायू, जल, तेज आणि पृथ्वी या मूलभूत तत्त्वांवर होणाऱ्या मानवी अतिक्रमणाने ऋतुचक्र बिघडत चालले आहे. त्यातून नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. माणसांच्या आरोग्यावरही त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. .याची जाणीवही सामान्यांमध्ये हळूहळू पसरत आहे. त्यामुळे सजग मानव आपल्या आहाराकडेही जाणीवपूर्वक पाहू लागला आहे. सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय अन्नांची मागणी झपाट्याने वाढत आहे. नैसर्गिक साधनांवर आधारित, रसायनमुक्त सेंद्रिय शेतीसाठी भारत सरकारनेही पुढाकार घेतला आहे. पारंपरिक ज्ञानाचा पुनर्विकास करणारी सेंद्रिय शेती म्हणजे शेणखत, गोमूत्र, पीक अवशेष आणि जैविक साधनांच्या वापरातून केलेली शेती होय. सेंद्रिय शेतीतून आरोग्यदायी, रसायन अवशेषमुक्त अन्ननिर्मिती, मातीची सुपीकता टिकवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे यांचा सुंदर संगम साधला जातो..Turmeric Farming: हळदीमध्ये कीड-रोग, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.सेंद्रिय हळदीचे महत्त्वहळद ही झिंगिबेरेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कुर्कुमा लोंगा आहे. भारतीय परंपरेत, आयुर्वेदामध्ये आणि आरोग्यशास्त्रात हळदीला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा वापर मसाला, औषधे आणि रंगनिर्मितीमध्ये होतो. औषधी घटकांसाठी वापर करताना प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या हळदीला प्राधान्य दिले जाते. रासायनिक खतांचा वापर न करता आणि नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली हळद प्रक्रियेद्वारे अधिक गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम बनते..सेंद्रिय शेती संशोधन संस्था (FiBL) यांच्या २०२१ मधील सर्वेक्षणानुसार, सेंद्रिय शेती करणाऱ्या १८७ देशांमध्ये भारतीय शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जागतिक पातळीवर भारत हा सर्वांत मोठा हळद उत्पादक असून, सुमारे ८० टक्के हळद उत्पादन भारतात होते. त्यातील १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. देशातील एकूण सेंद्रिय शेतीपैकी हळदीचे सेंद्रिय लागवडीखाली क्षेत्र सुमारे १.३ लाख हेक्टर आहे. .Turmeric Farming: हळदीमध्ये फेरपालटीसह आंतरपीक पद्धतीवर भर .यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तमिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांचा मोठा वाटा आहे. सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या हळद पिकाचे उत्पादन हेक्टरी ६ ते ८ टनांपर्यंत आहे. पारंपरिक हळदीच्या तुलनेत उच्च प्रत आणि अधिक औषधी गुणधर्म असल्याने सेंद्रिय प्रमाणपत्र असलेल्या हळदीस ४० टक्क्यांपर्यंत अधिक बाजारभाव मिळतो. .भारतातून दरवर्षी सुमारे १.५ लाख मेट्रिक टन हळद निर्यात केली जाते. त्यातही सेंद्रिय हळदीचा वाटा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील हवामान हळद लागवडीस अत्यंत पोषक असून, प्रामुख्याने सातारा, चंद्रपूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, नांदेड, नागपूर, हिंगोली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यांत तिचे उत्पादन होते..हळदीचे गुणधर्मकुर्कुमीन हा हळदीतील मुख्य सक्रिय घटक आहे. तो हळदीला पिवळसर रंगासोबतच औषधी गुणधर्मही देतो. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट, दाहशामकता, जिवाणू विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. हे कुर्कुमीन संधिवात, हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोगासारख्या अनेक आजारांवरील औषधांमध्ये होऊ लागला आहे. रासायनिक पद्धतीने घेतलेल्या हळदीच्या तुलनेत सेंद्रिय हळदीमध्ये कुर्कुमीनचे प्रमाण अधिक असते. परिणामी सेंद्रिय हळदीची मागणी वाढत आहे.- पूजा प. थुळ, ८५५२०३२०३८(पीएच.डी. संशोधक, प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.