GDP Growth Forecast: भारताचा विकासदर २०२६मध्ये ६.४ टक्के राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. याआधी, विकासदर ६.६ टक्के राहील, असे सांगण्यात आले होते. मात्र जागतिक अस्थिरता आणि पश्चिम आशियातील परिस्थिती निर्माण झालेल्या आर्थिक धक्क्यांमुळे या अंदाजात सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, विकासदरामध्ये घट होणार असली, तरीही भारत हीच जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असेही नमूद केले आहे..संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक विभागाकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का बसला असून, त्यामुळे विकासदर मंदावला आहे, महागाई वाढतानाच, अस्थिरतेतही भर पडल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे..India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार.जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर २.५ टक्के राहणार असून, जानेवारीमध्ये नमूद केलेल्या अंदाजापेक्षा हा दर ०.२ टक्क्यांनी कमी असेल. तसेच, कोरोना महासाथीपूर्वीच्या स्थितीपेक्षा तो खूपच कमी राहण्याची आहे..Agriculture Economy: कृषी-ग्रामीण अर्थकारणाचे नवे आयाम.या विभागातील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पीटल म्हणाले, ‘‘सध्याच्या जागतिक समस्यांपासून भाजप दूर राहू शकत नाही. भारत मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात करत असतो. याशिवाय, परदेशातील भारतीयांकडून पाठविण्यात येणाऱ्या पैशांवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. जगभरातील वित्तीय नियंत्रण वाढल्यामुळे वित्तधोरण अधिक गुंतागुंतीची झाली आहेत..पश्चिम आशियामुळे सर्व देशांवर परिणाम झाला असून, एका बाजूला विकासदर कमी होत असून, दुसरीकडे महागाईचा दबावही वाढत आहे. याचा परिणाम धोरणांवर होत आहे. हीच गोष्ट भारतालाही लागू होते. भारतीय रिझर्व्ह बँक आणि वित्तीय धोरणाशी संबंधित विभागाकडून याला प्रतिसाद कसा देण्यात येतो, हा खरा प्रश्न आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.