GM Food Regulation: ‘जीएम’ उत्पादनांच्या आयातीला परवानगी नाही; केंद्रीय मंत्री गोयल यांचे स्पष्टीकरण
Piyush Goyal Statement: ‘‘भारताने आजपर्यंत कोणत्याही जनुकीय सुधारित (जीएम) उत्पादनांच्या आयातीला परवानगी दिलेली नाही आणि भविष्यातही ती देणार नाही,’’ असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी स्पष्ट केले. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.