India Exports To China Rise: भारतासाठी चीन हे हळूहळू निर्यात केंद्र बनत आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत भारताची चीनमध्ये निर्यात ३३ टक्क्यांनी वाढून १२.२२ अब्ज डॉलरवर पोहोचली, असे वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवारीवरून दिसून आले आहे. चीनला झालेल्या निर्यातीत शेतमाल आणि सागरी उत्पादनांचाही समावेश आहे. .एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्या टॅरिफ धमक्या सुरु असताना, दुसरीकडे भारत- चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारत असल्याचे संकेत या निर्यात आकडेवारीतून मिळत आहेत..चीनमध्ये झालेल्या निर्यातीत झालेली वाढ ही प्रामुख्याने ऑइल मील, सागरी उत्पादने, दूरसंचार उपकरणे आणि मसाले यासारख्या उत्पादनांमुळे झाली आहे. एप्रिल–नोव्हेंबर २०२४–२५ दरम्यान भारताने ९.२ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. या तुलनेत, एप्रिल–नोव्हेंबर २०२२–२३ दरम्यान ही निर्यात ९.८९ अब्ज डॉलर आणि २०२३–२४ दरम्यान १०.२८ अब्ज डॉलर एवढी होती..Basmati Exports: इराणला होणारी बासमती तांदळाची निर्यात संकटात, २ हजार कोटींचा साठा बंदरावर अडकला.२०२५-२६ मधील १२.२२ अब्ज डॉलर्सच्या मोठ्या वाढीने गेल्या वर्षीच्या घसरणीला मागे टाकले. तसेच गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक निर्यातही ठरली आहे, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे..शेतमाल आणि सागरी उत्पादनांच्या निर्यातीत सुक्या मिरच्या, ब्लॅक टायगर कोळंबी, मूग, व्हॅनमेई कोळंबी आणि तेलघाण्यातील पेंड यांचा समावेश आहे. एकूण वाढीमध्ये अॅल्युमिनियम आणि रिफाइंड कॉपर बिलेटच्या निर्यातीचाही महत्त्वाचा वाटा राहिला..India Groundnut Export : इंडोनिशियाच्या कठोर आणि जाचक निकषांमुळे शेंगदाणा निर्यात ठप्प; निर्यातदारांची कोंडी.“ही वाढ इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून ते शेती आणि बेस मेटल्समध्ये दिसून येते. यावरून असे स्पष्ट होते की निर्यातीत झालेली वेगाने वाढ केवळ एका क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर भारताची चीनकडे निर्यात व्यापक संरचनात्मक विस्तार दर्शवते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले..उच्च शुल्कामुळे भारतीय उद्योगांना अमेरिकेत स्पर्धात्मक दराने वस्तूंची निर्यात करणे कठीण झाले आहे. यामुळे भारतीय उद्योग विविध देशांमध्ये निर्यातीची संधी शोधत आहेत..भारत-चीनमधील द्विपक्षीय व्यापार संबंधात अलिकडील काही दिवसात सुधारणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी चीनला भेट दिली. सात वर्षांनंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर सहमती झाली होती. या भेटीनंतर, थेट विमान सेवा पुन्हा सुरू झाली आणि चिनी व्यावसायिकांसाठी व्हिसा मंजुरी तातडीने केली गेली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.