ठळक मुद्देभारत आणि रशिया यांचा कृषी क्षेत्रात सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भरभारतातून रशियात कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याबाबत चर्चाशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न.Agricultural Trade : अमेरिकेने भारतावर भरमसाठ आयातशुल्क (टॅरिफ) लादले. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दबावतंत्राचा वापर केला. पण भारताने या दबावाला न जुमानता रशियासोबत द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर भर दिला आहे. .केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांच्यात शुक्रवारी दिल्लीतील कृषी भवन येथे उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी भारत आणि रशिया यांच्यात द्विपक्षीय कृषी क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करणे आणि व्यापार वाढविण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली..Agriculture In Schools: शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश; राज्य सरकारचे निर्देश .उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. यात विशेषतः कृषी क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. भारतातून रशियात कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणे, बाजारपेठेत प्रवेश अधिक सुलभ करणे. तांत्रिक आणि संशोधन भागीदारीसाठी नवीन संधींचा शोध घेणे, हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते..रशियाच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना, कृषिमंत्री चौहान यांनी, दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास आणि समजुतीवर आधारित मजबूत द्विपक्षीय भागीदारीचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी बोलताना कृषी क्षेत्रातील भारताच्या प्राधान्यांवर भर दिला. त्यात अन्न सुरक्षेबाबत सुनिश्चितता, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि सर्व नागरिकांना सुरक्षित, पोषक अन्न पुरवठा या मुद्यांचा समावेश होता. .Agriculture Success Story; करडईची उत्कृष्ट शेती, दर्जेदार बियाणे निर्मिती ."आंतरराष्ट्रीय सहकार्य हे शेतकरी कल्याण आणि जगभरातील नागरिकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते," असे चौहान म्हणाले. वसुधैव कुटुंबकम या तत्त्वाने प्रेरित त्यांनी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला..कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वावरशियाचे उपपंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी, कृषी व्यापार वाढविण्याच्या मुद्यावर अधिक भर दिला. त्यांनी सामंजस्य कराराद्वारे द्विपक्षीय भागीदारीला औपचारिक स्वरूप देण्यावर सहमती दर्शवली. त्यांनी भविष्यात कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव असल्याचे नमूद केले..या बैठकीत बियाणे शोधक्षमता प्रणाली, संशोधन आणि विकास उपक्रम, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी तांत्रिक देवाणघेवाण आदी संभाव्य सहकार्याच्या क्षेत्रांवरही चर्चा झाली. कृषीशी संबंधित क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिष्यवृत्तीच्या संधींमध्ये सहकार्य वाढवण्यावरही द्विपक्षीय सहमती दर्शवण्यात आली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.