Dharashiv News: ‘ईव्हीएम’बाबत निर्माण होणाऱ्या शंका, तांत्रिक गुंतागुंत आणि विश्वासाचा अभाव लक्षात घेता अनेक नागरिक पुन्हा मतपत्रिकेच्या पारंपरिक पद्धतीची मागणी करत आहेत. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकाच लोकशाहीचा कणा आहेत. या पार्श्वभूमीवर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी ‘ईव्हीएम हटवा, लोकतंत्र वाचवा’ ही मोहीम सुरू करीत तालुक्यातील तांदूळवाडी येथे बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणाचा मंगळवारी (ता. २०) सहावा दिवस होता..तांदूळवाडी येथील नागरिकही त्यांच्यासमवेत उपोषणास बसले आहेत. उपोषणामुळे आवारे पाटलांची प्रकृती खालवली असून निवडणूक आयुक्त यांनी अद्याप या आंदोलनाची दाखल घेतली नाही. मंगळवारी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आवारे पाटील यांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आंदोलनाला पाठिंबा देत आवारे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचे ॲड. प्रणित डिकले यांनी सांगितले..EVM Controversy: सालेकसामध्ये १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान.मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे. मात्र ‘ईव्हीएम’मुळे मतदारांच्या मनात संशयाची पाल चुकचुकत आहे. यंत्रांमध्ये छेडछाड शक्य आहे का, मत खरंच योग्य उमेदवारालाच जाते का, निकालात पारदर्शकता आहे का, असे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत..Election Controversy: व्हायरल व्हिडिओनंतर तहसीलदारांचे चौकशीसाठी पोलिसांना पत्र.अनेक देशांनी ईव्हीएम प्रणाली नाकारून पुन्हा मतपत्रिकेवर आधारित मतदान स्वीकारले असताना, भारतात ईव्हीएमवर अढळ विश्वास ठेवला जात असल्याने संशय अधिक गडद होत आहे. लोकांचा विश्वास नसलेली कोणतीही निवडणूक प्रक्रिया लोकशाहीला घातक ठरते. मतदान पारदर्शक हवे, विश्वासार्ह हवे आणि सर्वमान्य हवे. अन्यथा, लोकशाही केवळ कागदावर उरेल, असा इशारा आंदोलकांनी या वेळी दिला..‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिका पद्धत पुन्हा लागू करावी, स्वतंत्र व निष्पक्ष तपास यंत्रणा नेमावी आणि निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवावी. लोकशाही वाचवायची असेल तर जनतेच्या विश्वासाला प्राधान्य द्यावे लागेल. ‘ईव्हीएम’वरचा संशय दूर न झाल्यास लोकशाहीची मुळेच कमकुवत होतील. यासाठी सरकारने आणि निवडणूक आयोगाने ठोस निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.